१९ ऑक्टोबर दिनविशेष - 19 October in History
१९ ऑक्टोबर दिनविशेष - 19 October in History

हे पृष्ठ 19 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 19 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१२१६: इंग्लंडचा राजा जॉन मृत्यूमुखी पडल्यामुळे त्याचा ९ वर्षाचा मुलगा हेन्‍री हा राजेपदी आरुढ झाला.

नेपोलियन बोनापार्ट
नेपोलियन बोनापार्ट

१७८१: ब्रिटिश जनरल कॉर्नविलास अमेरिकेला शरण गेले, यामुळे अमेरिकन क्रांती युद्ध संपले.

१८१२: नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.

१८५३: अमेरिकतील हवाना येथे जगातील पहिली पिठाची गिरणी सुरु करण्यात आली.

१९३३: जर्मनी लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले.

१९३५: इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.

१९४४: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.

१९७०: भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द

आशा भोसले
आशा भोसले

१९९३: पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर

१९९४: रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा ’तानसेन पुरस्कार’ जाहीर.

२०००: पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

२००५: मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.

२०१९: सैनिकी शाळेत मुलींनाही प्रवेश मिळण्याच्या प्रस्तावाला स्वरक्षण मंत्री यांची मंजुरी मिळाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९०२: दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण – कथालेखक. ’किशोरीचे हृदय’, ’विद्या आणि वारुणी’ ही कादंबरी, ’तोड ही माळ’ हे नाटक व अनेक कथासंग्रह त्यांनी लिहीले. (मृत्यू: ३१ मे १९७३ – हैदराबाद, आंध्र प्रदेश)

१९१०: सुब्रमण्यन चंद्रशेखर – तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ कृष्णविवरांवरील संशोधनासाठी खर्च केला. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९९५)

प्रिया तेंडुलकर
प्रिया तेंडुलकर

१९२०: पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. न्याय, वेदांत व्याकरण आदि शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला. अवघ्या वीस सहकार्‍यांना बरोबर घेऊन त्यांनी ’स्वाध्याय परिवार’ सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. (मृत्यू: २५ आक्टोबर २००३)

१९२५: डॉ. वामन दत्तात्रय तथा ’वा. द.’ वर्तक – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक (मृत्यू: १७ एप्रिल २००१)

१९२९: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित गांधीवादी विचारधारी भारतीय समाजसेविका निर्मला देशपांडे यांचा जन्मदिन.

१९३६: शांताराम नांदगावकर – गीतकार (मृत्यू: ११ जुलै २००९)

अजय सिंग देओल ऊर्फ ‘सनी देओल‘ – अभिनेता
अजय सिंग देओल ऊर्फ ‘सनी देओल‘ – अभिनेता

१९५४: प्रिया तेंडुलकर – रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या. ’जन्मलेल्या प्रत्येकासाठी’ या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. (मृत्यू: १९ सप्टेंबर २००२)

१९५६: भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता, राजकारणी आणि पंजाब राज्यातील गुरदासपूर येथील विद्यमान संसद सदस्य अजयसिंग देओल उर्फ सनी देओल यांचा जन्मदिन.

१९६१: अजय सिंग देओल ऊर्फ ‘सनी देओल‘ – अभिनेता

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१२१६: जॉन – इंग्लंडचा राजा (जन्म: २४ डिसेंबर ११६६)

१७४५: आयर्लँड देशातील निबंधकार, कवी, आणि व्यंगचित्रकार जोनाथन स्विफ्ट(Jonathan Swift) यांचे निधन.

अर्नेस्ट रुदरफोर्ड
अर्नेस्ट रुदरफोर्ड

१९३४: विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले. (जन्म: २४ डिसेंबर १८६४)

१९३७: अर्नेस्ट रुदरफोर्ड – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ३० ऑगस्ट १८७१)

१९५०: विष्णू गंगाधर तथा ’दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८८७)

१९८६: मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३३)

१९९५: बाल कलाकार म्हणून पुढे आलेल्या व नंतर सहाय्यक अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी पावलेल्या सलमा बेग ऊर्फ ’बेबी नाझ’ यांचे निधन. (जन्म: ? ? ????)

२००३: बोत्सिया व हर्जेगोविना देशाचे पहिले अध्यक्ष अलिजा इझेटबेगोविच यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९२५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *