लालमोहन घोष – देशभक्त
लालमोहन घोष – देशभक्त

हे पृष्ठ 18 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 18 October. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर

२००२ : कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.

१९७७ : २०६०-चिरॉन हा अंतरिक्षातील सर्वात दूरवरील लघुग्रह शोधण्यात आला.

१९६७ : सोविएत रशियाचे ’व्हेनेरा-४’ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.

१९२२ : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना

१९१९ : राम गणेश गडकरी लिखित ’संगीत भावबंधन’ या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या ’बळवंत संगीत नाटक मंडळी’ने केला.

१९०६ : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी ’डिप्रेस्ड क्लास मिशन’ची स्थापना केली.

१८७९ : थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना

१८६७ : सोविएत रशियाला ७२ लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

मार्टिना नवरातिलोव्हा
मार्टिना नवरातिलोव्हा

१९५६ : मार्टिना नवरातिलोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू

१९५० : ओम पुरी – अभिनेता

१९३९ : ली हार्वे ओस्वाल्ड – राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)

इब्राहिम अल्काझी
इब्राहिम अल्काझी

१९२५ : इब्राहिम अल्काझी – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक

१८६१ : ’भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक, आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘महाभारताचा उपसंहार‘ या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य‘ ही पदवी दिली. (मृत्यू: २० एप्रिल १९३८)

१८०४ : मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) – थायलंडचा राजा (मृत्यू: १ आक्टोबर १८६८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

विजय मांजरेकर – क्रिकेटपटू
विजय मांजरेकर – क्रिकेटपटू

२००४ : वीरप्पन – चंदन तस्कर (जन्म: १८ जानेवारी १९५२)

१९९५ : ई. महमद – छायालेखक (शेजारी, दहा वाजता, आसमान, चोरीचा मामला) (जन्म: ? ? ????)

१९९३ : मंदाकिनी विश्वनाथ आठवले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री. दादासाहेब फाळके यांच्या त्या कन्या होत. त्यांनी फाळके यांच्या ’कालियामर्दन’ या मूकपटात काम केले होते. (जन्म: ? ? ????)

हिराबाई पेडणेकर
हिराबाई पेडणेकर

१९८७ : वसंतराव तुळपुळे – कम्युनिस्ट कार्यकर्ते. कार्ल मार्क्सच्या ’दास कापिटाल’ या ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता. (जन्म: ? ? ????)

१९८३ : विजय मांजरेकर – क्रिकेटपटू (जन्म: २६ सप्टेंबर १९३१)

१९५१ : हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार (जन्म: २२ नोव्हेंबर १८८५)

१९३१ : थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक (जन्म: ११ फेब्रुवारी १८४७)

१९०९ : लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष, भारताच्या विविध राजकीय हक्‍कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला. (जन्म: १७ डिसेंबर १८४९ – कलकत्ता)

१८७१ : चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक (जन्म: २६ डिसेंबर १७९१)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.