स्मिता पाटील – अभिनेत्री
स्मिता पाटील – अभिनेत्री

हे पृष्ठ 17 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 17 October. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

अभिनेते डॉ. श्रीराम लागू
अभिनेते डॉ. श्रीराम लागू

१९९८ : आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्‍या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान

१९९६ : अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर

१९९४ : पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना ’डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक’ जाहीर

मदर तेरेसा
मदर तेरेसा

१९७९ : मदर तेरेसा नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित

१९६६ : बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९४३ : बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला.

१९३४ : ’प्रभात’चा ’अमृतमंथन’ हा चित्रपट पुण्याच्या ’प्रभात’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्याच दिवशी या चित्रपटाची हिन्दी आवृत्ती मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाली. हिन्दीत हा चित्रपट २९ आठवडे चालला. हिन्दी चित्रपटाचा रौप्यमहोत्सव होण्याची ही पहिलीच वेळ होती.

१९३३ : अल्बर्ट आइनस्टाइन नाझी जर्मनीतुन पळून अमेरिकेत आला.

१९३१ : माफिया डॉन अल कपोनला आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा झाली.

१९१७ : पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्बहल्ला केला.

१८३१ : मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

अनिल कुंबळे – भारतीय लेग स्पिनर
अनिल कुंबळे – भारतीय लेग स्पिनर

१९७० : अनिल कुंबळे – भारतीय लेग स्पिनर?

१९६५ : अरविंद डिसिल्व्हा – श्रीलंकेचा क्रिकेट क ललित लेखकप्तान

१९५५ : स्मिता पाटील – अभिनेत्री. त्यांचे ’निशांत’, ’मंथन’, ’भूमिका’, ’जैत रे जैत’, ’गमन’, ’चक्र’, ’उंबरठा’ इत्यादी चित्रपट लोकप्रिय झाले. पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड (मृत्यू: १३ डिसेंबर १९८६ – मुंबई)

सर सय्यद अहमद खान
सर सय्यद अहमद खान


१९४७ : सिम्मी गरेवाल – चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका

१९१७ : विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी (मृत्यू: १३ डिसेंबर १९९४)

१८९२ : नारायणराव सोपानराव बोरावके – कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार, पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यांत अनेक संस्था व उद्योग त्यांनी उभे केले. संशोधित फळांच्या उत्पादनास त्यांनी प्रोत्साहन दिले. १९३३ मध्ये त्यांना रावसाहेब तर १९४६ मध्ये त्यांना ‘रावबहादूर‘ हे किताब मिळाले. शेतीच्या आधुनिकीकरणावर त्यांनी भर दिला. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९६८)

१८६९ : ’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक, बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू, ’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक (मृत्यू: ८ एप्रिल १९२२)

१८१७ : सर सय्यद अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते (मृत्यू: २७ मार्च १८९८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

रविन्द्र पिंगे – ललित लेखक
रविन्द्र पिंगे – ललित लेखक

२००८ : रविन्द्र पिंगे – ललित लेखक (जन्म: १३ मार्च १९२६)

१९९३ : विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक, त्यांचे रामराज्य (१९४३), बैजू बावरा (१९५२), गूंज उठी शहनाई (१९५९), हिमालय की गोद में (१९६५) हे चित्रपट खूप गाजले. ’फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. (जन्म: १२ मे १९०७ – पालिताणा, गुजराथ)

१९०६ : जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली (जन्म: २२ आक्टोबर १८७३)

१८८७ : गुस्ताव्ह किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ मार्च १८२४)

१८८२ : दादोबा पांडुरंग तर्खडकर – इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक, संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करुन व मराठी भाषेच्या रुपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून त्यांनी व्याकरण सिद्ध केले. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही त्यांनी लिहिले. (जन्म: ९ मे १८१४)

१७७२ : अफगणिस्तानचा राज्यकर्ता अहमदशाह दुर्रानी (दुराणी) याचे निधन. अहमदशाहने ’दुर्र-इ-ईरान’ असा आपला किताब जाहीर केल्यापासून अब्दाली टोळ्या ’दुर्रानी’ नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. (जन्म: ? ? ????)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.