८ एप्रिल दिनविशेष - 8 April in History
८ एप्रिल दिनविशेष - 8 April in History

हे पृष्ठ 8 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 8th April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • जपान – बुद्धाचा जन्मदिवस.
  • जागतिक रोमा (रोमनियन) दिवस.

महत्त्वाच्या घटना:

१८३८: ’द ग्रेट वेस्टर्न’ हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.

१९११: डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा (superconductivity) शोध लावला.

१९२१: आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.

१९२९: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.

१९५०: भारत आणि पाकिस्तान यांच्या लियाकत-नेहरू करारावर स्वाक्षर्‍या.

१९९३: मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले

२००५: पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१३३६: तैमूरलंग – मंगोलियाचा राजा (मृत्यू: १४ फेब्रुवारी १४०५)

१९२२: ’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक, बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू, ’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक (मृत्यू: १७ आक्टोबर १८६९)

१९२४: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ ’कुमार गंधर्व’ (मृत्यू: १२ जानेवारी १९९२)

१९२८: रणजित देसाई – नामवंत मराठी साहित्यिक, ’स्वामी’कार (मृत्यू: ६ मार्च १९९२)

१९३८: कोफी अन्नान – संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) चे ७ वे प्रधान सचिव

१९७९: भारतीय गायक-गीतकार अमित त्रिवेदी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८५७: १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामची सुरूवात करणारा मंगल पांडे याला फाशी देण्यात आले. [चैत्र शु. १४] (जन्म: १९ जुलै १८२७)

१८९४: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या ’आनंदमठ’ या कादंबरीत ’वंदे मातरम’ हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली. (जन्म: २७ जून १८३८)

१८९४: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, सुप्रसिध्द बंगाली साहित्यिक व ‘वंदे मातरम्‌’ ह्या गीताचे रचनाकार.

१९०६: अल्झायमरच्या आजाराने निदान झालेल्या पहिल्या व्यक्ती एग्स्टे डिटर यांचे निधन. (जन्म: १६ मे १८५०)

१९२२: भास्करबुवा बखले, अष्टपैलू व श्रेष्ठ गायक – कलावंत

१९२२: ’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक, बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू, ’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक (जन्म: १७ आक्टोबर १८६९)

१९५३: वालचंद हिराचंद दोशी – उद्योगपती (जन्म: २३ नोव्हेंबर १८८२)

१९७३: पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार (जन्म: २५ आक्टोबर १८८१)

१९७४: नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक – मर्दानी रुप, तिन्ही सप्तकांतुन सहजपणे फिरणारा आवाज या देणग्या लाभलेले व गंधर्वयुगाची स्मृती जागवणारे रंगभूमीवरील कलाकार (जन्म: २४ जून १८९९)

१९९९: वसंत खानोलकर – कामगार नेते, समाजवादी चळवळीतील एक अग्रणी, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचे वडील (जन्म: ? ? ????)

२०१३: मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान (जन्म: १३ आक्टोबर १९२५)

२०१५: भारतीय पत्रकार आणि लेखक जयकानधन यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *