हे पृष्ठ 13 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 13 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
५४: नीरो १७ व्या वर्षी रोमन सम्राट बनला.
१७७३: चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.
१८८४: लंडन शहराजवळील ग्रिनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
१९२३: मुस्तफा कमाल पाशाने तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरुन अंकारा येथे हलवली.
१९२९: पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले. त्यासाठी सत्याग्रह झाला होता.
१९४४: दुसरे महायुद्ध – लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.
१९४६: फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.
१९७०: फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
२०१३: मध्य प्रदेश मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११५ जण ठार आणि ११० जण जखमी झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८७७: भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते, १९३१ मधे ’गांधी-आयर्विन’ कराराप्रमाणे त्यांनी बार्डोलीच्या शेतकर्यांची बाजू मांडली. १९३२ मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली होती. (मृत्यू: ६ मे १९४६ )
१९११: अशोक कुमार गांगूली ऊर्फ ‘दादामुनी’ – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या (मृत्यू: १० डिसेंबर २००१)
१९२४: भारतीय राजकारणी मोतीरु उदयम यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००२)
१९२५: मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान (मृत्यू: ८ एप्रिल २०१३)
१९३६: भारतीय वीणा वादक आणि संगीतकार चित्ती बाबू यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९९६)
१९४१: जॉन स्नो – इंग्लिश क्रिकेटपटू
१९४३: सऊबर एफ १ चे संस्थापक पीटर सऊबर यांचा जन्म.
१९४८: नुसरत फतेह अली खान – पाकिस्तानी सूफी गायक (मृत्यू: १६ ऑगस्ट १९९७)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१२८२: जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १२२२)
१२४०: रझिया सुलतान – भारतातील पहिली महिला राज्यकर्ती (जन्म: ?? १२०५)
१९११: मार्गारेट नोबल ऊर्फ ‘भगिनी निवेदिता’ – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्या मूळच्या आयरिश होत्या. २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रम्हचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव ‘निवेदिता‘ ठेवले. (जन्म: २८ आक्टोबर १८६७)
१९३८: पॉपॉय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८९४)
१९४५: मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक (जन्म: १३ सप्टेंबर १८५७)
१९६५: डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८९९ – ओल्टेन, स्वित्झर्लंड)
१९८७: आभा सकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. ‘चलती का नाम गाडी’ सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ‘दूर गगन की छाँव में’ सारखे गंभीर चित्रपटही काढले. (जन्म: ४ ऑगस्ट १९२९)
१९९५: डॉ. रामेश्वर शुक्ल तथा ’अंचल’ – हिन्दी साहित्यिक (जन्म: १ मे १९१५ – किशनपूर, फतेहपूर, उत्तर प्रदेश)
२००१: डॉ. जाल मिनोचर मेहता – कुष्ठरोगतज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक, पुणे जिल्हा रेड क्रॉसचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८२), ’सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ चे संचालक
२००३: नोबेल पारितोषिक विजेते केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ बर्ट्राम ब्रॉकहाउस यांचे निधन.