हे पृष्ठ 12 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 12 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
जागतिक स्पॅनिश भाषा दिवस
महत्त्वाच्या घटना:
१४९२: ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे पोचला. आपण भारतात पोहोचलो आहोत असा त्याचा समज झाला.
१८२३: स्कॉटलंडचे चार्ल्स मॅकिंटॉश यांनी पहिला रेनकोट विकला.
१८४७: वर्नर वॉन सीमेन्स यांनी सीमेन्स व हलस्के (सीमेन्स एजी) कंपनी ची सुरवात केली.
१८५०: अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू
१८७१: भारतात ब्रिटिश सरकारने ’क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट’ या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.
१९०१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूजवेल्ट यांनी कार्यकारी हवेली ला अधिकृतपणे व्हाईट हाऊस हे नाव ठेवले.
१९६०: संयुक्त राष्ट्रांसमोर भाषण करताना सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांनी आपला मुद्दा ठसवण्यासाठी टेबलावर जोडा आपटला.
१९६४: सोव्हियत संघाने एकापेक्षा जास्त चालकांना घेऊन जाणारे पहिले अवकाश उड्डाण वोसखोड१ प्रक्षेपित केले.
१९६८: मेक्सिकोतील मेक्सिको सिटी येथे १९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९८३: लॉकहीड कॉर्पोरेशनकडून वीस लाख अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानचे पंतप्रधान तनाका काकुऐ यांना चार वर्षांचा कारावास.
१९८८: जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.
१९९८: तेहतिसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने तिची लढत जिंकून ’इंटरनॅशनल वूमन मास्टर’ हा किताब मिळवला.
१९९३: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना.
२०००: भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर के. वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. इव्हॅन्जेलिना व्हिलेगास यांना प्रोटिनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल ’सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार’ जाहीर
२००१: संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर
२००२: दहशतवाद्यांनी इंडोनेशियातील बालीमधे दोन बारमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात २०२ जण ठार तर ३०० जण जखमी झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८६०: गॅरोकोम्पास चे निर्माते एल्मर अॅम्ब्रोस स्पीरी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९३०)
१८६८: ऑडी मोटार कंपनी चे संस्थापक ऑगस्ट हॉच यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९५१)
१८८८: पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय क्रांतीकारक महिला, समाजसेवक, व महात्मा गांधी यांची अनुयायी पेरीन बेन कॅप्टन यांचा जन्मदिन.
१९११: विजय मर्चंट – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक (मृत्यू: २७ आक्टोबर १९८७)
१९१८: मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम – उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, ’बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ (BCCI) चे अध्यक्ष; उपाध्यक्ष व खजिनदार, तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, चेन्नईचे महापौर (१९५५), चेन्नईतील ’चेपॉक’ स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले आहे. (मृत्यू: १९ जानेवारी २०००)
१९१९: ग्वाल्हेरच्या राजमाता या नावाने लोकप्रिय असलेल्या भारतीय राजनैतिक नेता विजया राजे सिंधिया यांचा जन्मदिन.
१९२१: जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि शिकार इ. विविध क्षेत्रांमधे दीर्घकाळ सक्रिय असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक (मृत्यू: २३ एप्रिल २००१)
१९२२: शांता शेळके – शब्दांवर मनापासून प्रेम करणार्या आणि आपल्या विविध भावभावनांचा अविष्कार अचूकपणे व्यक्त करणार्या समर्थ कवयित्री आणि गीतलेखिका. त्यांनी कथा, कादंबरी, कविता, चित्रपटगीते, भावगीते, नाट्यगीते, बालगीते, ललितलेखन व लघुनिबंध इत्यादि प्रकारांत विपुल लेखन केले. कालिदासाचे ’मेघदूत’ आणि अनेक जपानी हायकूंचा त्यांनी अनुवाद केला. ’वडीलधारी माणसे’ हे व्यक्तिचित्रण ’गोंदण’, ’वर्षा’, ’रुपसी’ इ. काव्यसंग्रह, ’रंगरेषा’, ’आनंदाचे झाड’ इ. ललित लेखसंग्रह, ’धूळपाटी’ हे आत्मचरित्र इ. त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांनी ७० ते ७५ चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. (मृत्यू: ६ जून २००२)
१९३५: भारतीय वकील आणि राजकारणी शिवराज पाटील यांचा जन्म.
१९३८: साली पद्मश्री पुरस्कार तसचं, साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय उर्दू कवी, गीतकार आणि संवाद लेखक निदा फाजली यांचा जन्मदिन.
१९४६: अशोक मांकड – क्रिकेटपटू (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१६०५: बादशाह अकबर – हिन्दुस्तानचा तिसरा मुघल सम्राट (जन्म: १५ आक्टोबर १५४२)
१९६५: पॉल हर्मन म्युलर – डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९४८) मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १२ जानेवारी १८९९ – ओल्टेन, स्वित्झर्लंड)
१९६७: डॉ. राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक. १९३२ मधे ’मिठाचा सत्याग्रह’ या विषयावरील प्रबंधाकरता त्यांना बर्लिन विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली. इंग्रजीचे ते उत्तम जाणकार होते . मात्र त्यांना इंग्रजीची गुलामी मान्य नव्हती. इंग्रजी येत असुनही ‘अंग्रेजी हटाओ‘ ही चळवळ त्यांनी चालविली होती. (जन्म: २३ मार्च १९१०)
१९९६: रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ’पोलो’ टी शर्टचे जनक (जन्म: २ जुलै १९०४)
२०११: सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रितची यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १९४१)
२०१२: भारतीय न्यायाधीश व राजकारणी सुखदेव सिंग कांग यांचे निधन. (जन्म: १५ मे १९३१)