२ जुलै दिनविशेष - 2 July in History
२ जुलै दिनविशेष - 2 July in History

हे पृष्ठ 2 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 2 July. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

जगदीश स्वामीनाथन
जगदीश स्वामीनाथन

१६९८: थॉमस सावेरी यांनी पहिले स्टीम इंजिन चे पेटंट मिळवले.

१८५०: बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला ’गॅस मास्क’चे अनेरिकन पेटंट बहाल

१८६२: कलकत्ता येथील उच्च न्यायालयाची स्थापना उच्च न्यायालयीन कायदा १८६१ अंतर्गत करण्यात आली.

१८६५: ’साल्व्हेशन आर्मी’ या सेवाभावी संस्थेची स्थापना

१९४०: सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.

नेताजी सुभाषचंद्र बोस
नेताजी सुभाषचंद्र बोस

१९६२: रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले ’वॉल मार्ट’ स्टोअर उघडले.

१९७२: भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षर्‍या केल्या.

१९८३: कल्पक्कम, तामिळनाडू येथील अणूऊर्जा केंद्र सुरू झाले.

१९९४: चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्यप्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड

केसरिया स्तूप
केसरिया स्तूप

२००१: बिहारमधील चंपारण्य जिल्हयातील केसरिया गाव येथे ०४ फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौध्द स्तूप सापडला.

२००२: स्टीव फॉसेट हा उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला.

२००४: युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केलं.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८६२: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम हेन्री ब्रॅग यांचा जन्म.

१८७७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक हेर्मान हेस यांचा जन्म.

जवाहरलाल अमोलकचंद दर्डा
जवाहरलाल अमोलकचंद दर्डा

१८८०: गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक, ’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक (मृत्यू: २३ डिसेंबर १९६५)

१८९३: स्वतंत्र भारतातील पंजाब राज्याचे पहिले राज्यपाल व आंध्रप्रदेश राज्याच्या स्थापने नंतरचे आंध्रप्रदेश राज्याचे पहिले राज्यपाल चंदूलाल माधवलाल त्रिवेदी यांचा जन्मदिन.

१९०४: रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ’पोलो’ टी शर्टचे जनक (मृत्यू: १२ आक्टोबर १९९६)

१९०६: नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ बेटे हान्स आल्ब्रेख्ट यांचा जन्म.

१९२२: पिअर कार्डिन – फ्रेन्च फॅशन डिझायनर

१९२३: जवाहरलाल अमोलकचंद दर्डा – स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी (मृत्यू: ? ? ????)

१९२५: पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: १७ जानेवारी १९६१)

१९२६: विनोदी लेखक वि. आ. तथा विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म.

१९३०: कार्लोस मेनेम – अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष

१९४६: प्रसिद्ध भारतीय लेखक, पत्रकार व साहसी कादंबरीकार अरुपकुमार दत्त यांचा जन्मदिन.

१९५४: प्रसिद्ध भारतीय चित्रपट पार्श्वगायक मुहम्मद अझीज यांचा जन्मदिन.

१९६०: हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरेतील प्रसिद्ध लखनऊ तबला घराण्याची शाखा असलेल्या जोशी जोशी घराण्याचे सदस्य भारतीय गायक पंडित संतोष जोशी यांचा जन्मदिन.

१९८३: भारतीय व्यावसायिक पॅरा-बॅडमिंटनपटू व उत्तरप्रदेश राज्यातील गौतमबुद्ध नगरचे जिल्हा दंडाधिकारी सुहास ललीनाकेरे यथिराज यांचा जन्मदिन.

रेने लॅकॉस्त
रेने लॅकॉस्त

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१५६६: नोट्रे डॅम (Nostradamus) – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता (जन्म: १४ डिसेंबर १५०३)

१७७८: रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार (जन्म: २८ जून १७१२)

दिलीप सरदेसाई
दिलीप सरदेसाई

१८४३: डॉ. सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (जन्म: १० एप्रिल १७५५)

१९५०: युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर (जन्म: २३ सप्टेंबर १९०३)

१९६१: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी आत्महत्या केली (जन्म: २१ जुलै १८९९)

डॉ. सॅम्यूअल हानेमान
डॉ. सॅम्यूअल हानेमान

१९९९: मारिओ पुझो – अमेरिकन लेखक (जन्म: १५ आक्टोबर १९२०)

२००७: दिलीप सरदेसाई – क्रिकेटपटू (जन्म: ८ ऑगस्ट १९४०)

२०११: चतुरानन मिश्रा – केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: ७ एप्रिल १९२५)

२०१३: कॉम्पुटर माउस चे शोधक डगलस एंगलबर्ट यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *