हरभजनसिंग
हरभजनसिंग

हे पृष्ठ 3 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 3 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

सुधीर फडके

२००६ : एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळुन (साधारण चंद्राइतक्या अंतरावरुन) गेला.

२००१ : सुधीर फडके यांना राज्य सरकारचा ’गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

२००० : विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रुपांतर करण्यास नौदल, राज्यसरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छिमार प्रतिनिधींनी मान्यता दिली.

१९९८ : ’ए मेरे वतन के लोगो …’ या प्रसिद्ध गाण्याचे कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

महात्मा फुले

१९३८ : ‘मॅलार्ड’ हे वाफेचे इंजिन ताशी १२६ मैल (२०२ कि. मी.) वेगाने न्यू कॅसलहून लंडनला पोहोचले. वाफेच्या इंजिनाचा हा वेगाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.

१८९० : आयडाहो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.

१८८६ : जर्मनीच्या कार्ल बेन्झ याने जगातील पहिली मोटारगाडी बनवली.

१८८४ : डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.

१८५५ : भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.

१८५० : इस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातुन आणलेला ’कोहिनूर’ हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.

१८५२ : महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.

१६०८ : सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्‍वेबेक शहराची स्थापना केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८० : हरभजनसिंग – भारतीय क्रिकेटपटू

१९७६ : हेन्‍री ओलोंगा – झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू

१९५१ : सर रिचर्ड हॅडली – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू

१९२६ : सुनीता देशपांडे – लेखिका व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९)

१९२४ : सेलप्पन रामनाथन – सिंगापूरचे ६ वे राष्ट्राध्यक्ष

१९१४ : दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार (मृत्यू: ५ जानेवारी १९९२)

१९१२ : श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट (मृत्यू: १६ जून १९७७)

१९०९ : बॅरिस्टर व्ही. एम. तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (मृत्यू: २२ मार्च २००४)

१८८६ : रामचंद्र दत्तात्रय तथा ’गुरूदेव’ रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक (मृत्यू: ६ जून १९५७)

१८३८ : मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक (मृत्यू: १३ सप्टेंबर १८९३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

राजकुमार’ ऊर्फ ’जानी

१९९६ : कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता (जन्म: ८ आक्टोबर १९२६)

१९६९ : ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स‘चे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक (जन्म: २८ फेब्रुवारी १९४२)

१३५० : संत नामदेव यांनी समाधी घेतली. (जन्म: २९ आक्टोबर १२७०)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *