हे पृष्ठ 13 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १३ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that have occurred on 13 September. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१५९८: फ्रांस चे शासक हेनरी चतुर्थ (Henry IV) यांनी इसाई धर्माचा नांत चा प्रख्यात आदेश जारी केला.
१७८४: रेगुलेटिंग ॲक्टच्या दुर्बलतेवर मात करण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ब्रिटीश संसदेने पिट्स इंडिया ॲक्ट (PITS INDIA ACT) पास केला.
१८९८: हॅनीबल गुडविन यांनी सेल्यूलॉइड फोटोग्राफिक फिल्म चे पेटंट घेतले.
१९१३: साली ब्रिटीश धातुशास्त्रज्ञ हॅरी ब्रेअर्ली (Harry Brearley) यांनी स्टेनलेस स्टीलचा आविष्कार केला.
१९२२: लीबीयातील अझिजीया येथे ५७.२° सेल्सिअस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
१९४८: ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.
१९८५: सुपर मारियो गेम जपान मध्ये प्रकाशित झाला.
१९८९: आर्चबिशप डेसमंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.
१९९६: महिला आणि बालकल्याणासाठी लक्षणीय कामगिरी बजावणार्या महिलेला देण्यात येणारा ’श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेविका आणि स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्या श्रीमती इंदुमती पारिख यांना देण्यात आला.
२०००: चीनच्या शेनयांग येथे 1 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2000 दरम्यान खेळण्यात आलेली 24-खेळाडूंची श्रेणी XVI ची बुद्धिबळ स्पर्धा म्हणजेच फिड वर्ल्ड कप (FIDE) विश्वनाथ आनंद यांनी जिंकला
२००३: मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
२००३: ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
२००८: दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३० जण ठार तर सुमारे १३० जण जखमी झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८४५: साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे ब्रिटीश अध्यक्ष हेनरी कॉटन (Henry Cotton) यांचा जन्मदिन.
१८५२: गणेश जनार्दन आगाशे – नामांकित शिक्षक, संस्कृत पंडित, व्युत्पन्न ग्रंथकार, उत्तम वक्ते व इंदूर येथे भरलेल्या १० व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: ? ? ????)
१८५७: मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक (मृत्यू: १३ आक्टोबर १९४५)
१८६५: भारतीय-इंग्रजी फील्ड मार्शल विल्यम बर्डवुड यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १९५१)
१८८६: सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७५)
१८९०: मोनाको ग्रांप्री चे संस्थापक अँटोनी नोगेस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९७८)
१९३२: डॉ. प्रभा अत्रे – शास्त्रीय गायिका
१९३९: साली प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी व निबंधकार भागवत रावत यांचा जन्मदिन.
१९४६: साली परमवीर चक्र पुरस्कार सन्मानित भारतीय सैन्य दलाचे अधिकारी मेजर रामास्वामी परमेश्वरन यांचा जन्मदिन.
१९६७: मायकेल जॉन्सन – अमेरिकन धावपटू
१९६९: शेन वॉर्न – ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर
१९७१: गोरान इव्हानिसेव्हिच – क्रोएशियाचा लॉन टेनिसखेळाडू
१९७६: क्रेग मॅकमिलन – न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू
१९८०: भारतीय हॉकी खेळाडू वीरेन रास्किन्हा यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८९३: मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक (जन्म: ३ जुलै १८३८)
८१: टायटस – रोमन सम्राट (जन्म: ३० डिसेंबर ३९)
१९२६: श्रीधर पाठक – हिन्दी कवी, लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म: ११ जानेवारी १८५८)
१९२८: सुप्रिसद्ध हिंदी कवी श्रीधर पाठक यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८५८)
१९२९: लाहोर कटातील क्रांतिकारक जतिन दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा ६३ व्या दिवशी मृत्यू झाला. (जन्म: २७ आक्टोबर १९०४)
१९७१: केशवराव त्र्यंबक दाते – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक. महाराष्ट्र नाटक मंडळी या संस्थेच्या नाटकांमधून त्यांनी काही स्त्री नायिकांच्या भूमिका केल्या. (जन्म: २४ सप्टेंबर १८८९ – अडिवरे, रत्नागिरी, महाराष्ट्र)
१९७३: भारतीय कवी आणि तत्त्ववेक्षक सज्जाद झहिर यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९०५)
१९७५: भारतीय गायक आणि संगीतज्ञ मुदिकॉन्दाम वेंकटरम अय्यर यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १८९७)
१९९५: डॉ. महेश्वर नियोग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष (जन्म: ७ सप्टेंबर १९१५ – कमरफादिया, शिवसागर, आसाम)
१९९७: लालजी पाण्डेय तथा ’अंजान’ – हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार (जन्म: २८ आक्टोबर १९३०)
२००४: गर्भनिरोधक गोळी चे संशोधक लुइस ई. मिरमोंटेस यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९२५)
२०१२: रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश (जन्म: २५ नोव्हेंबर १९२६)