जगजीतसिंग
जगजीतसिंग

हे पृष्ठ 8 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 8 February. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

गणपत आंदळकर

२००० : छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.

१९७१ : NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.

१९६० : पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर ’हिंदकेसरी’ बनले.

१९४२ : दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.

१९३६ : १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या ’बँक ऑफ महाराष्ट्र’चे कामकाज सुरू झाले.

१९३१ : महादेव विठ्ठल काळे यांनी ‘आत्मोद्धार’ नावाचे पाक्षिक सुरू केले.

१८९९ : रँडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या गणेश शंकर द्रविडरामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.

१७१४ : छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

शोभा गुर्टू

१९६३ : मोहम्मद अजहरुद्दीन – भारतीय क्रिकेटपटू

१९४१ : जगजीतसिंग – गझलगायक (मृत्यू: १० आक्टोबर २०११)

१९२५ : शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (मृत्यू: २७ सप्टेंबर २००४)

१९०९ : प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (३ जानेवारी १९९८)

१८९७ : डॉ. झाकिर हुसेन – भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न हे सन्मान त्यांना देण्यात आलो होते. ’जमिया मिलिया इस्लामिया’ या शिक्षण संस्थेचे संपादक पुढे ही संस्था विद्यापीठात रुपांतरित झाली. (मृत्यू: ३ मे १९६९)

१८४४ : गोविंद शंकरशास्त्री बापट – भाषांतरकार (मृत्यू: ? ? ????)

१८३४ : दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २ फेब्रुवारी १९०७)

१८२८ : ज्यूल्स वर्न – फ्रेन्च लेखक (मृत्यू: २४ मार्च १९०५)

१७०० : डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ (मृत्यू: १७ मार्च १७८२)

१६७७ : जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ एप्रिल १७५६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

भास्करराव सोमण

१९९९ : डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका (जन्म: १४ मे १९२६)

१९९५ : भास्करराव सोमण – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल. १९६५ च्या भारत – पाक युद्धकाळात ते नौदलप्रमुख होते. (जन्म: ? मार्च १९१३)

१९९४ : गोपाळराव देऊसकर – ख्यातनाम चित्रकार (जन्म: ? ? १९११)

१९९४ : यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक (जन्म: १९ जुलै १९०२)

१९७५ : सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १३ सप्टेंबर १८८६)

१९७१ : डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि ‘भारतीय विद्याभवन’चे संस्थापक (जन्म: ३० डिसेंबर १८८७)

१९२७ : बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: ७ सप्टेंबर १८४९)

१७२५ : पीटर द ग्रेट (पहिला) – रशियाचा झार (जन्म: ९ जून १६७२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *