१० ऑक्टोबर दिनविशेष - 10 October in History
१० ऑक्टोबर दिनविशेष - 10 October in History

हे पृष्ठ 10 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १० ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 10 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • जागतिक मृत्यूदंड निषेध दिन
  • राष्ट्रीय टपाल दिवस

महत्त्वाच्या घटना:

१८४६: इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.

१९११: चीनमध्ये किंग वंशाचा शेवट.

१९१३: पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.

१९४२: सोविएत युनियनने ऑस्ट्रेलियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.

१९४४: दुसरे महायुद्ध – ज्यूंचे शिरकाण – ८०० जिप्सी बालकांना ऑस्विच छळछावणीत ठार करण्यात आले.

१९५४: आचार्य अत्रे निर्मित श्यामची आई’ चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक. चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यास या वर्षापासून सुरुवात झाली.

१९६०: विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९६४: जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९७०: फिजीला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.

१९७५: पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

आदर्श सेन आनंद
आदर्श सेन आनंद

१९९२: साली पश्चिम बंगाल मधील हुगळी नदीवरील कोलकाता आणि हावडा शहरांना जोडणारा पूल विद्यासागर सेतु प्रवासाकरिता सुरु करण्यात आला.

१९९८: आदर्श सेन आनंद यांनी भारताचे २९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०१४: पाकिस्तानी शालेय विद्यार्थिनी व महिला मानवाधिकार कार्यकर्ता मलाला युसुफ यांना नोबल पारितोषिक पुरस्कार बहाल करण्यात आला.

२०१४: साली थोर भारतीय समाजसुधारक कैलाश सत्यार्थी यांना शांततेचा नोबल पुरस्कार बहाल करण्यात आला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

हेन्‍री कॅव्हँडिश
हेन्‍री कॅव्हँडिश

१७३१: हेन्‍री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१०)

१८३०: स्पेनची राणी इसाबेला (दुसरी) यांचा जन्म.

१८४४: बद्रुद्दिन तैय्यबजी – कायदेपंडित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३ रे अध्यक्ष (मृत्यू: ? ? १९०६)

१८७१: शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक (मृत्यू: २३ एप्रिल १९५८)

श्रीपाद अमृत डांगे
श्रीपाद अमृत डांगे

१८७७: मॉरिस मोटर्सचे संस्थापक विल्यम मॉरिस यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९६३)

१८९९: कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते, गोवा मुक्ती समितीचे अध्यक्ष. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांना तत्कालीन सोविएत संघराज्यातर्फे ‘ऑर्डर ऑफ लेनिन’ सन्मान प्रदान करण्यात आला. (मृत्यू: २२ मे १९९१)

१९०२: के. शिवराम कारंथ – कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत (मृत्यू: ९ डिसेंबर १९९७)

१९०६: रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण – लेखक. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार, पद्मभूषण (१९६४), पद्मविभूषण (२००१), साहित्य अकादमी पारितोषिक व ए. सी. बेन्सन पदक (१९८०) या सन्मानांनी गौरविण्यात आले होते. ’द गाईड’, ’द वर्ल्ड ऑफ नागराज’, ’वेटिंग फॉर महात्मा’ इ. कादंबर्‍या, तसेच ’मालगुडी डेज’, ’ए हॉर्स अँड टू गोट्‌स’ इ. कथासंग्रह अतिशय लोकप्रिय झाले. (मृत्यू: १३ मे २००१)

रेखा – चित्रपट अभिनेत्री
रेखा – चित्रपट अभिनेत्री

१९०९: क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (मृत्यू: ११ सप्टेंबर १९९८ – पुणे, महाराष्ट्र)

१९१०: डॉ. द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (मृत्यू: ९ डिसेंबर १९४२)

१९१२: भारतीय कवी आणि समीक्षक राम विलास शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २०००)

१९१६: डॉ. लीला मूळगांवकर – सामाजिक कार्यकर्त्या, मुंबईच्या माजी नगरपाल, भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक (मृत्यू: २० मे १९९२)

१९५४: रेखा – चित्रपट अभिनेत्री

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८९८: मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक, आर्यसंस्कृतीचे व शंकराचार्यप्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते (जन्म: २६ सप्टेंबर १८५८)

१९६४: वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते. त्यांचे ‘चौदहवी का चांद‘, ‘कागज के फूल‘, ‘सीआयडी‘, ‘मि. अंड मिसेस ५५‘, ‘आरपार‘ आणि ‘प्यासा‘ इ. चित्रपट लोकप्रिय ठरले. त्यांच्या ‘साहिब बिबी और गुलाम‘ या चित्रपटाला राष्ट्रपतीपदक मिळाले. (जन्म: ९ जुलै १९२५)

१९८३: रुबी मायर्स ऊर्फ ’सुलोचना’ – मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री, पाणीदार व बोलक्या डोळ्यांमुळे त्यांना सुलोचना हे टोपणनाव पडले, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या (१९७३) (जन्म: ? ? १९०७)

२०००: सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. त्यांचे पती श्रीलंकेचे व दुसरे पंतप्रधान सॉलोमन बंदरनायके यांच्या हत्येनंतर त्या पंतप्रधान झाल्या. त्यांनीच देशाचे ’सिलोन’ हे नाव बदलून ’श्रीलंका’ केले. खाजगी शाळा, तेलकंपन्या रबराचे मळे व चहाचे मळे यांचे त्यांनी राष्ट्रीयीकरण केले. (जन्म: १७ एप्रिल १९१६)

जगजीतसिंग – गझलगायक
जगजीतसिंग – गझलगायक

२००५: युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटे यांचे निधन.

२००६: सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका (जन्म: ४ आक्टोबर १९१३)

२००८: रोहिणी भाटे – कथ्थक नर्तिका (जन्म: १४ नोव्हेंबर १९२४)

२०११: जगजीतसिंग – गझलगायक (जन्म: ८ फेब्रुवारी १९४१)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *