८ फेब्रुवारी दिनविशेष - 8 February in History
८ फेब्रुवारी दिनविशेष - 8 February in History

हे पृष्ठ 8 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 8 February. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

गणपत आंदळकर
गणपत आंदळकर

१७१४: छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.

१८४९: रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.

१८९९: रँडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.

१९३१: महादेव विठ्ठल काळे यांनी ‘आत्मोद्धार’ नावाचे पाक्षिक सुरू केले.

१९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या ’बँक ऑफ महाराष्ट्र’चे कामकाज सुरू झाले.

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.

१९४३: आजच्या दिवशी नेताजी सुभाष चंद्र बोस जर्मनी मधून एका नावेच्या माध्यमाने जपान साठी निघाले.

१९६०: पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर ’हिंदकेसरी’ बनले.

१९७१: NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.

१९८६: आजच्या दिवशी दिल्लीच्या विमानतळावर प्रीपेड टॅक्सी ची सुरुवात.

१९९४: भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.

१९९९: आजच्या दिवशी अंतराळातून स्टारडस्ट नावाचे अंतरीक्ष यान रवाना झाले.

२०००: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.

२००८: ओडीसा च्या शशुपालगढ येथे २५०० वर्षापूर्वीचे शहर उत्खनन करते वेळी सापडले.

२०१५: नीती आयोगाची पहिली बैठक

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

शोभा गुर्टू
शोभा गुर्टू

१६७७: जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ एप्रिल १७५६)

१७००: डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ (मृत्यू: १७ मार्च १७८२)

१८२८: ज्यूल्स वर्न – फ्रेन्च लेखक (मृत्यू: २४ मार्च १९०५)

१८३४: दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २ फेब्रुवारी १९०७)

१८४४: गोविंद शंकरशास्त्री बापट – भाषांतरकार (मृत्यू: ? ? ????)

१८८१: सिविल सर्विसेस मध्ये असलेले वी.टी. कृष्णमाचारी यांचा जन्म.

१८९७: डॉ. झाकिर हुसेन – भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न हे सन्मान त्यांना देण्यात आलो होते. ’जमिया मिलिया इस्लामिया’ या शिक्षण संस्थेचे संपादक पुढे ही संस्था विद्यापीठात रुपांतरित झाली. (मृत्यू: ३ मे १९६९)

१९०९: प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (३ जानेवारी १९९८)

१९२५: शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (मृत्यू: २७ सप्टेंबर २००४)

जगजीतसिंग
जगजीतसिंग

१९४१: जगजीतसिंग – गझलगायक (मृत्यू: १० आक्टोबर २०११)

१९५१: हिंदी भाषेचे प्रसिद्ध लेखक अशोक चक्रधर यांचा जन्म.

१९६३: मोहम्मद अजहरुद्दीन – भारतीय क्रिकेटपटू

१९८०: भारतीय चित्रपट अभिनेते जयदीप अहलावत यांचा जन्म.

१९८६: भारतीय महिला क्रिकेटर एकता बिष्ट यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७२५: पीटर द ग्रेट (पहिला) – रशियाचा झार (जन्म: ९ जून १६७२)

१९२७: बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: ७ सप्टेंबर १८४९)

१९६५: च्या भारत – पाक युद्धकाळात ते नौदलप्रमुख होते. (जन्म: ? मार्च १९१३)

१९७१: डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि ‘भारतीय विद्याभवन’चे संस्थापक (जन्म: ३० डिसेंबर १८८७)

१९७५: सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १३ सप्टेंबर १८८६)

१९९४: यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक (जन्म: १९ जुलै १९०२)

भास्करराव सोमण
भास्करराव सोमण

१९९४: गोपाळराव देऊसकर – ख्यातनाम चित्रकार (जन्म: ? ? १९११)

१९९५: भास्करराव सोमण – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल.

१९९५: भारतीय स्वातंत्र्य सैनिक कल्पना दत्त यांचे निधन.

१९९५: राजस्थान चे माजी मुख्यमंत्री टीका राम पलीवाल यांचे निधन.

१९९९: डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका (जन्म: १४ मे १९२६)

२००६: भारतीय मॉडेल कुलजित रंधवा यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *