१६ एप्रिल दिनविशेष - 16 April in History
१६ एप्रिल दिनविशेष - 16 April in History

हे पृष्ठ 16 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 16th April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१८५३: भारतातील पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावर धावण्यास सुरुवात झाली.

१९१९: साली पंजाब मधील अमृतसर येथे झालेल्या जालीयनवाला बाग हत्याकांड प्रकरणी निधन पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली देण्यासाठी महात्मा गांधी यांनी आजच्या दिवशी उपवास करण्याची घोषणा केली होती.

१९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला.

१९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना

१९७२: केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून ’अपोलो-१६’ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.

१९९५: देशातील लोकशाही टिकवुन ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्‍नांचा गौरव म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ’ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान

१९९९: चालकरहित ’निशांत’ विमान व जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या ’त्रिशूल’ क्षेपणास्त्राची ऒरिसातील चंडीपूर येथे चाचणी

२०१३: इराण या देशांत झालेल्या भूकंपामुळे ३७ नागरिकांचा मृत्यू झाला होता.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८४८: कंडुकुरी वीरेसलिंगम, आंध्र प्रदेशमधील समाजसुधारक.

१८६७: विल्बर राईट, अमेरिकन विमानसंशोधक.

१८८९: चार्ली चॅप्लिन, अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार

१८९६: मद्रास विद्यापीठातील पुरातत्व शास्त्राचे माजी प्राध्यापक विष्णमपेट आर. रामचंद्र दीक्षित यांचा जन्मदिन.

१९२४: भारतीय राजनयिक मदनजीत सिंग यांचा जन्म.

१९२५: भारतीय मुत्सद्दी, चित्रकार, छायाचित्रकार आणि लेखक मदनजीत सिंग यांचा जन्मदिन.

१९३४: रामचंद्र दामोदर तथा राम नाईक – केन्द्रीय पेट्रोलिअम मंत्री, रेल्वे राज्यमंत्री व भाजपचे नेते

१९४२: विल्यम्स एफ-१ रेसिंग टीमचे स्थापक फ्रॅंक विल्यम्स यांचा जन्म.

१९६१: भारतीय वकील आणि राजकारणी जर्बोम गॅमलिन यांचा जन्म.

१९६३: सलीम मलिक – पाकिस्तानी क्रिकेटपटू

१९७२: कोंचिता मार्टिनेझ – स्पॅनिश लॉनटेनिस खेळाडू

१९७८: लारा दत्ता – मॉडेल, हिन्दी चित्रपट अभिनेत्री व निर्माती, मिस युनिव्हर्स (२०००)

१९९१: चित्रपट आणि नाटक अभेनेते आशिष खाचणे यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७५६: जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (जन्म: ८ फेब्रुवारी १६७७)

१८५०: मेरी तूसाँ – ’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका (जन्म: १ डिसेंबर १७६१)

१९५१: प्रसिद्ध बंगाली भाषिक लेखक अद्वैत मल्लाबरमन यांचे निधन.

१९६१: गुरुद्वारा सुधार चळवळ तसचं, अखंड किर्थनी जथाची स्थापना करणारे प्रसिद्ध शीख नेते रणधीर सिंह यांचे निधन.

१९६६: जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस – श्री. बोस यांनी शांतिनिकेतनमधे सुमारे ३० वर्षाहून अधिक काळ अध्यापन करून अनेक चित्रकार तयार केले. (जन्म: ३ डिसेंबर १८८२)

१९९५: रमेश टिळेकर – अभिनेते व वकील, ’घाशीराम कोतवाल’ या नाटकातील भूमिकेसाठी प्रसिद्ध (जन्म: ? ? ????)

२०००: दिनकर गोविंद तथा अप्पासाहेब पवार – ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले कृषीतज्ञ, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, शाहू महाराजांचे चरित्रकार (जन्म: ? ? १९३०)

२००७: भारतीय वंशाचे अमेरिकन प्राध्यापक गोबीचेट्टीपालम वासुदेवन “जी. व्ही.” लोगानाथन यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *