डॉ. राजेन्द्र प्रसाद
डॉ. राजेन्द्र प्रसाद

हे पृष्ठ 3 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 3 December. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

कृषी शिक्षण दिन

भारतीय कृषी संशोधन परिषदेने पहिले भारतीय केंद्रीय कृषी मंत्री (1946) आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती, भारतरत्न, डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा वाढदिवस (3 डिसेंबर) भारतात कृषी शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

जागतिक अपंग दिन

जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.

महत्त्वाच्या घटना:

डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड
डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड

१९८४ : भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील ’युनियन कार्बाईड’ या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.

१९७९ : आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.

१९७१ : पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.

१९६७ : डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.

१८७० : ’बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी’ या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.

१८२९ : लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.

१८१८ : इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.

१७९६ : दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

खुदिराम बोस
खुदिराम बोस

१८९२ : माधव केशव काटदरे – निसर्गकवी (मृत्यू: ३ सप्टेंबर १९५८)

१८८९ : खुदिराम बोस – क्रांतिकारक (मृत्यू: ११ ऑगस्ट १९०८)

१८८४ : डॉ. राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६३)

१८८२ : जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस – श्री. बोस यांनी शांतिनिकेतनमधे सुमारे ३० वर्षाहून अधिक काळ अध्यापन करून अनेक चित्रकार तयार केले. (मृत्यू: १६ एप्रिल १९६६)

१७७६ : हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर (मृत्यू: २८ आक्टोबर १८११)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

देव आनंद
देव आनंद

२०११ : देव आनंद – चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: २६ सप्टेंबर १९२३)

१९७९ : मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीपटू (जन्म: २९ ऑगस्ट १९०५)

१९५१ : बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत. (जन्म: २४ ऑगस्ट १८८०)

१८९४ : आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी (जन्म: १३ नोव्हेंबर १८५०)

१५५२ : सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक. यांनी भारत व जपानमधे हजारो लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. गोव्यातील ’ओल्ड चर्च’मधे यांचेच शव अजून जपून ठेवण्यात आले आहे. (जन्म: ७ एप्रिल १५०६ – झेविअर, स्पेन)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.