हे पृष्ठ 3 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही ३ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 3 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
३०१: ३०१ई.पूर्व : जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले.

१७५२: अमेरिकेत ग्रेगरीयन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.
१९१६: श्रीमती अॅनी बेझंट यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली.
१९२१: बेल्जियम देशांत कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यात आली.
१९३५: सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.
१९३९: जर्मन सम्राट हिटलर यांच्या पोलंड, ब्रिटन आणि फ्रान्सवर केलेल्या हल्ल्याला प्रती उत्तर म्हणून, सत्ता गाजविलेल्या राष्ट्राच्या दोन्ही मित्रपक्षांनी जर्मनीविरुद्ध युद्धाची घोषणा केली.
१९७१: कतारला स्वातंत्र्य मिळाले.
२००४: भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यात या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात नाजूक शांतता वाढत असताना, भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिल्ली येथे बैठक घेऊन शांततेचा करार केला.
२०१८: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लिहिलेल्या “मुव्हिंग ऑन मुव्हिंग फोरवर्ड : ए इयर इन ऑफिस” या पुस्तकाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
२०१९: भारतातील मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ या शहरात सुरु असलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात वीर धवल खाडे व दिव्या सतीजा यांनी राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१६१७: मुघल सम्राट शाहजहां आणि त्यांची पत्नी मुमताज महल यांची दुसरी मुलगी रोशनारा बेगम यांचा जन्मदिन.
१८५५: पंत महाराज बाळेकुन्द्री – आध्यात्मिक गुरू (मृत्यू: १६ आक्टोबर १९०५)
१८६९: फ्रिट्झ प्रेग्ल – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्करणासाठी १९२३ मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ (मृत्यू: १३ डिसेंबर १९३०)

१८७५: फर्डिनांड पोर्श – ऑस्ट्रियन वाहन अभियंता (मृत्यू: ३० जानेवारी १९५१)
१९०५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ कार्ल डेव्हिड अँडरसनयांचा जन्म.
१९०५: भारतीय राजकारणी, लेखक, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक कमलापती त्रिपाठी यांचा जन्मदिन.

१९२३: किशन महाराज – संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसचं पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्यातील सुप्रसिद्ध तबला वादक पंडित. तबला सम्राट. बनारस घराण्याचे तबला वादक. वडिलांकडून त्यांनी आपले शिक्षण सुरु केले. वडिलांच्या मृत्यूपश्चात काका कंठे महाराज यांचे ते शिष्य बनले. वयाच्या ११ व्या वर्षापर्यंतच त्यांची तयारी एवढी झाली होती की ते साथसंगत करू लागले. फैय्याज खान, पं. ओंकारनाथ ठाकूर, बडे गुलाम अली खाँ, पं. भीमसेन जोशी, पं. वसंत राय, पं. रवी शंकर, उस्ताद अली अकबर खाँ, उस्ताद विलायत खाँ अशा अनेक दिग्गजांना त्यांनी साथ सांगत केली. लयकाऱ्या आणि तिहाया यांत त्यांचा हातखंडा होता. साथसंगत करण्यात ते एकदम वाकबगार होते. गायन, सतार, सरोद, धृपद, धमार, नृत्य अशा सर्व प्रकारात ते साथीला असत. श्री. शंभू महाराज, सितारा देवी, नटराज गोपी कृष्ण, पं. बिरजू महाराज अशा अनेक नृत्यकलेतील दिग्गजांना त्यांनी साथ केली आहे. तबल्याचे सोलो कार्यक्रमही ते करीत. ‘मृदंगम विद्वान’ पालघाट रघू यांच्याबरोबर निर्मिलेली ‘ताल वाद्य कचेरी’ ही त्यांची रचना प्रसिद्ध आहे. त्यांना पद्मश्री (१९७३), पद्मविभूषण (२००२) अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. पं. नंदन मेहता, सुखविंदर सिंग नामधारी, कुमार बोस, विनीत दास, संदीप दास, बाळकृष्ण अय्यर, शुभ महाराज, पूरण महाराज, आनंद महाराज, अरविंद कुमार आझाद हे त्यांचे काही प्रसिद्ध शिष्य आहेत.
(मृत्यू: ४ मे २००८)

१९२३: कृष्णराव तथा ’शाहीर’ साबळे – संगीत नाटक अकादमी तसचं पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन मराठी शाहीर. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या आपल्या कार्यकमातून लावणी, कोकेवाला (ग्रामीण भागात सारंगीसारखे वाद्य वाजवून देवादिकांची आख्याने गाणारा), बाल्यानृत्य (मुंबईत उपाहारगृहांत, धनिकांकडे, तसेच चाळींतील लोकांकडे कामाला असलेल्या कोकणी गड्यांचे–बाल्यांचे–नृत्य), कोळीनृत्य, गोंधळीनृत्य, मंगळागौर, वाघ्यामुरळी, वासुदेव, धनगर इत्यादींचे जिवंत दर्शन ते घडवत असत. या कार्यक्रमाला अफाट लोकप्रियता मिळाली होती (मृत्यू: २० मार्च २०१५)
१९२३: टाको बेल चे संस्थापक ग्लेन बेल यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी २०१२)
१९२६: भारतीय बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेते उत्तम कुमार यांचा जन्मदिन.
१९२७: अरुण कुमार चटर्जी तथा ’उत्तम कुमार’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते (मृत्यू: २४ जुलै १९८०)

१९३१: श्याम फडके – नाटककार (’काका किशाचा’, ’तीन चोक तेरा’, ’राजा नावाचा गुलाम’ फेम)
१९३८: नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी यांचा जन्म.
१९४०: प्यारेलाल रामप्रसाद शर्मा – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार
१९५६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिझु दासगुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २०१२)
१९५७: भारतीय योग गुरु व सद्गुरू नावाने प्रख्यात ईशा फाउंडेशनचे संस्थापकजग्गी वासुदेव यांचा जन्मदिन.
१९६५: अमेरिकन अभिनेता चार्ली शीन यांचा जन्म.

१९७१: भारतीय-अमेरिकन लेखक किरण देसाई यांचा जन्म.
१९७४: भारतीय क्रिकेटपटू राहुल संघवी यांचा जन्म.
१९७६: विवेक ओबेरॉय – अभिनेता
१९९२: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय कुस्तीपटू महिला साक्षी मलिक यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१६५८: इंग्लंडचा राज्यकर्ता ऑलिव्हर क्रॉमवेल यांचे निधन.
१९४८: चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड बेनेस यांचे निधन.

१९५३: लक्ष्मण तथा ’खाप्रुमामा’ पर्वतकर – तबला, घुमट व सारंगीवादक. गोव्यातील ‘घुमट’ हे तालवाद्य ते अत्यंत कौशल्याने वाजवत. त्यांनी लयकारीमध्ये विविध, नावीन्यपूर्ण व आश्चर्यजनक प्रयोग केले आणि तालाच्या जाणकारांमध्ये लौकिक संपादन केला. दिलेल्या मूळच्या लयीत कोणतीही पट ते लीलया करीत असत. त्याचप्रमाणे ते एकाच वेळी एका पायाने त्रिताल, दुसऱ्या पायाने झपताल, एका हाताने लय, दुसऱ्या हाताने चौताल धरून तोंडाने सवारीचा ठेका म्हणत असत. तोंडाने विशिष्ट बोलांची तीन आवर्तने करत असतानाच ते त्याच वेळी तबल्यावर पाच वेळा तोच बोल वाजवून दोन्हींची सम अचूक साधत असत आणि हे करताना लयीची यत्किंचितही ओढाताण झालेली दिसून येत नसे. एखादी परण तोंडातून उलटी म्हणत असतानाच तबल्यावर सुलटी वाजवून ते समेवर बरोबर येत. त्यांनी पावणेसोळा मात्रांचा ‘परब्रह्म’ ताल रचून त्यात पाव मात्रेचे १२५ ‘धा’ असलेली ‘महासुदर्शन‘ नामक परण बांधली. या त्यांच्या अद्भुत व अद्वितीय लयसिद्धीमुळेच त्यांना ख्यातनाम गायक अल्लादियाखाँ यांनी ‘लयब्रह्मभास्कर’ ही पदवी देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. (जन्म: ? ? १८८०)
१९५८: माधव केशव काटदरे – निसर्गकवी (जन्म: ३ डिसेंबर १८९२)

१९६७: अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक, जाहिरातशास्त्रातील तज्ञ. ’मौज’ आणि ’निर्भिड’ ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली. जातीयता निर्मूलनासाठी त्यांनी सहभोजनाचा (त्या काळातील धाडसी) उपक्रम चालवला. (जन्म: १६ आक्टोबर १८९०)
१९९१: अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांचे निधन.
२०००: पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर – स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती
२०१४: भारतीय राजकारणी ए. पी. वेंकटेश्वरन यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९३०)