दादाभाई नौरोजी
दादाभाई नौरोजी

हे पृष्ठ 4 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ४ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 4 September. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

लॅरी पेज
लॅरी पेज

२०१३ : रघुराम राजन यांनी ’रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चे २३ वे गव्हर्नर म्हणुन पदभार हाती घेतला.

२००१ : Hewlett Packard या कंपनीने संगणक क्षेत्रातील Compaq Corporation ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.

१९९८ : स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी ’गुगल’ची स्थापना केली.

सर्गेइ ब्रिन
सर्गेइ ब्रिन

१९७२ : मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.

१९३७ : व्हेनिसमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ’प्रभात’च्या ’संत तुकाराम’ या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली. इतर दोन चित्रपट होते ऑस्ट्रेलियाचा ’फ्लाइंग डॉक्टर’ आणि हंगेरीचा ’मारिया नोव्हेर’.

१९०९ : बालवीर (Scout) चळवळीचा पहिला मेळावा झाला. लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सुरू केलेली ही चळवळ थोड्याच काळात जगभर पसरुन लोकप्रिय झाली.

१८८८ : जॉर्ज इस्टमन याने ’कोडॅक’ हा ट्रेडमार्क नोंदवला व फिल्म कॅमेर्‍याचे पेटंट घेतले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

सुशीलकुमार शिंदे
सुशीलकुमार शिंदे
ऋषी कपूर
ऋषी कपूर

१९७१ : लान्स क्लूसनर – दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू

१९६२ : किरण मोरे – यष्टीरक्षक

१९५२ : ऋषी कपूर – अभिनेता

१९४१ : सुशीलकुमार शिंदे – केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

१९३७ : शंकर सारडा – साहित्यिक व समीक्षक

१९१३ : परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर – प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९९८)

१८२५ : पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय (मृत्यू: ३० जून १९१७)

१२२१ : श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक (मृत्यू: ७ फेब्रुवारी १२७४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

मोहम्मद उमर
मोहम्मद उमर

२००० : मोहम्मद उमर ’मुक्री’ – आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते (जन्म: ५ जानेवारी १९२२)

१९९७ : डॉ. धर्मवीर भारती – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व ’धर्मयुग’ साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक, ’अभ्युदय’ व ’संगम’ या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. (जन्म: २५ डिसेंबर १९२६)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.