International Day for the Elimination of Violence against Women
International Day for the Elimination of Violence against Women

हे पृष्ठ 25 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 25 November. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

अब्दुल हलीम जाफर खाँ
  • शाकाहार दिन
  • International Day for the Elimination of Violence against Women

महत्त्वाच्या घटना:

२००० : सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर

१९९९ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना ’इंदिरा गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर

कमल नारायण सिंग


१९९४ : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील ’इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’तर्फे देण्यात येणारा ’राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार’ जाहीर

१९९१ : कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७५ : सुरीनामला (नेदरलँड्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.
 

सावळाराम लक्ष्मण हळदणकर – चित्रकार

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५२ : इम्रान खान – पाकिस्तानी क्रिकेटपटू व राजकारणी

१९३९ : उस्ताद रईस खान – मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक

१९२६ : रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२)

रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश

१८८२ : सावळाराम लक्ष्मण हळदणकर – चित्रकार (मृत्यू: ३० मे १९६८)

१८७९ : साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (मृत्यू: १६ जानेवारी १९६६)

१८७२ : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, ’केसरी’चे संपादक, ’नवाकाळ’चे संस्थापक (मृत्यू: २६ ऑगस्ट १९४८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर

२०१३ : लीला पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका. ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या ’स्वर्गाची सहल आणि इतर कहाण्या’ या पुस्तकाचा ’नॅशनल बुक ट्रस्ट’ने ११ भाषांत अनुवाद प्रसिद्ध केला. (जन्म: ५ सप्टेंबर १९२०)

१९९८ : परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर – प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष (जन्म: ४ सप्टेंबर १९१३ – गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान)

१९८४ : यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: १२ मार्च १९१३)

अनंत सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्यापंडित

१९७४ : यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (जन्म: २२ जानेवारी १९०९)

१९६२ : गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ ‘दासगणू महाराज’ – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’, ’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत. (जन्म: ६ जानेवारी १८६८ – अकोळनेर, अहमदनगर)

१९६० : अनंत सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्यापंडित (जन्म: २४ सप्टेंबर १८९८)

१९२२ : पांडुरंग दामोदर गुणे – प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक (जन्म: २० मे १८८४ – राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र)

१८८५ : अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा (जन्म: २८ नोव्हेंबर १८५७)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *