हे पृष्ठ 22 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही २२ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 22 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.
१९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.
१९४७: भारतीय घटनेची रुपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर
१९६३: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.
१९७१: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९२: रॉबर्टा बॉन्डर ह्या अवकाशात जाणाऱ्या पहिला महिला ठरल्या.
१९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
२००१: ’आय. एन. एस. मुंबई’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली.
२००६: इवा मोराल्स यांनी बोलीवियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
२०१५: बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१५६१: सर फ्रँन्सिस बेकन – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी (मृत्यू: ९ एप्रिल १६२६)
१८७७: आसाम चे प्रमुख कार्यकर्ते तरुण राम फुकन यांचा जन्म.
१८९२: भारताचे स्वातंत्र्य सैनिक ठाकुर रोशन सिंह यांचा जन्म.
१८९६: कवी सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला यांचा जन्म.
१८९७: भारताचे प्रसिद्ध गायक दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.
१८९९: हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.
१९०९: यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४)
१९११: मराठी लेखक अनिरुद्ध घनश्याम रेळे यांचा जन्म.
१९१६: हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (मृत्यू: १५ जानेवारी १९९४)
१९१६: सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक, चलती का नाम गाडी
१९२०: प्रा. ह. श्री. शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक (मृत्यू: ? ? ????)
१९२२: मराठी लेखिका शांता बुध्दिसागर यांचा जन्म.
१९३४: विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)
१९४९: त्रिपुरा चे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांचा जन्म.
१९५८: दोस्ती [१९६४], रात और दिन [१९६७], आंसू बन गये फूल [१९६९], जीवन मृत्यू [१९७०] हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. (मृत्यू: ९ जून १९९३)
१९७३: अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने गर्भपाताला मान्यता दिली, कोणतीही महिला गर्भवती असताना ६ महिन्यांपर्यंत गर्भपात करू शकते.
१९९६: कॅलिफोर्निया च्या वेधशाळेतील शास्त्रज्ञांनी पृथ्वी पासून ३,५०,००० प्रकाश वर्ष इतक्या अंतरावर असलेल्या दोन नवीन ग्रहांचा शोध लावला.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१२९७: योगी चांगदेव समाधिस्थ (जन्म: ? ? ????)
१६६६: ५ वा मुघल सम्राट शहाजहान याचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन (जन्म: ५ जानेवारी १५९२)
१६८२: समर्थ रामदास स्वामी (जन्म: ? ? १६०८)
१७९९: होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे – ऑस्ट्रियन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक
१९०१: व्हिक्टोरिया – इंग्लंडची राणी, हिने ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य केले. हिच्या कारकिर्दीत इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसे अशी ख्याती होती. व्हिक्टोरिया राणीच्या काळातच भारत इंग्लंडचा गुलाम झाला. (जन्म: २४ मे १८१९)
१९६७: डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि ’गदर पार्टी’ चे शिल्पकार (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४)
१९७२: स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (जन्म: ३ आक्टोबर १९०३)
१९७३: लिंडन बी. जॉन्सन – अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)
१९७५: ’काव्यविहारी’ धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४)
१९७८: हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४)
२००४: भारतीय चित्रपट अभिनेत्री मेनका देवी यांचे निधन.