१५ जानेवारी दिनविशेष - 15 January in History
१५ जानेवारी दिनविशेष - 15 January in History

हे पृष्ठ 15 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १५ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 15 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • राष्ट्रीय सैन्य दिवस.

महत्त्वाच्या घटना:

१५५९: राणी एलिझाबेथ (पहिली) हिचा इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.

१७६१: पानिपतचे तिसरे युद्ध संपले.

जनरल करिअप्पा
जनरल करिअप्पा

१८६१: एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.

१८८९: द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.

१९४९: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.

जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर
जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर

१९७०: मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.

१९७३: जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.

१९९६: भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.

ज्योत्स्‍ना भोळे
ज्योत्स्‍ना भोळे

१९९९: गायिका ज्योत्स्‍ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२००१: सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ’विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७७९: रॉबर्ट ग्रँट – मुंबई इलाख्याचे राज्यपाल, मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक, मुंबईतील ग्रँट रोड हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो. (मृत्यू: ? ? १८३८)

१८५६: भारताचे प्रसिध्द राजनीती मर्मज्ञ, सामाजिक कार्यकर्ते अश्विनी कुमार दत्त यांचा जन्म.

बाबासाहेब भोसले
बाबासाहेब भोसले

१९१८: भारताचे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक यशवंत अग्रवाडेकर यांचा जन्म.

१९२०: डॉ. आर. सी. हिरेमठ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९८)

१९२१: बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री [कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३] (मृत्यू: ६ आक्टोबर २००७)

कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव
कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव

१९२६: कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८४)

१९२९: मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ एप्रिल १९६८)

१९३१: मराठीह कथाकार शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचा जन्म.

१९३८: भारतीय फुटबॉलर चुनी गोस्वामी यांचा जन्म.

मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर)
मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर)

१९४७: पत्रकार नितीश नंदी यांचा जन्म.

१९५६: बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचा जन्म.

१९८२: प्रसिद्ध अभिनेता नील नितीन मुकेश यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९७१: दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार (जन्म: ३० मे १९१६)

गुलजारीलाल नंदा
गुलजारीलाल नंदा

१९९४: हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (जन्म: २२ जानेवारी १९१६)

१९९८: गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (जन्म: ४ जुलै १८९८)

२००२: विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर – राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत (जन्म: ? ? १९३५)

नामदेव लक्ष्मण ढसाळ
नामदेव लक्ष्मण ढसाळ

२००९: दादासाहेब फाळके पुरस्कार जिंकणारे तपन सिन्हा यांचे निधन.

२०१२: भारताच्या पहिल्या महिला फोटोग्राफर होमाई व्यारावाला यांचे निधन.

२०१३: डॉ. शरदचंद्र गोखले – समाजसेवक (जन्म: २९ सप्टेंबर १९२५)

२०१४: नामदेव लक्ष्मण ढसाळ – दलित साहित्यिक (जन्म: १५ फेब्रुवारी १९४९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *