४ अप्रैल दिनविशेष - 4 April in History
४ अप्रैल दिनविशेष - 4 April in History

हे पृष्ठ 4 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 4th April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१८८२: ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या .

१९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.

१९४९: पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी संरक्षणविषयक सामंजस्य करार करुन ’नाटो’ची (NATO) स्थापना केली.

१९४९: पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे ‘नाटो करार’ करण्यात आला.

१९६८: ’नासा’ने ’अपोलो-६’ चे प्रक्षेपण केले.

१९६८: मेम्फिस, टेनेसी येथे जेम्स अर्ल रे याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या केली.

१९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८२३: सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता, अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारी ’सिमेन्स’ ही बलाढ्य कंपनी त्याच्याच भावाने स्थापन केली आहे. (मृत्यू: १९ नोव्हेंबर १८८३)

१८४२: एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (मृत्यू: ३ आक्टोबर १८९१)

१८९३: पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९८५)

१९०२: पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (मृत्यू: १ एप्रिल १९८४)

१९०६: फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे स्थापक एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९९४)

१९३३: रामचंद्र गंगाराम तथा ’बापू’ नाडकर्णी – डावखुरे मंदगती गोलंदाज

१९७३: भारतीय संचालक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६१७: जॉन नेपिअर – स्कॉटिश गणितज्ञ, लॉगॅरिथम सारणीचे जनक (जन्म: ? ? १५५०)

१९२३: जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ (जन्म: ४ ऑगस्ट १८३४)

१९३१: आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती (जन्म: १६ जानेवारी १८५३)

१९६८: मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या (जन्म: १५ जानेवारी १९२९)

१९७९: पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भूट्टो यांना फाशी (जन्म: ५ जानेवारी १९२८)

१९८७: सच्‍चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (जन्म: ७ मार्च १९११- खुशीनगर, देवरिया, उत्तर प्रदेश)

१९९६: आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (जन्म: ५ जुलै १९२०)

२०००: वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर – कलादिग्दर्शक (जन्म: ? ? ????)

२०१६: भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९४७)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *