७ मार्च दिनविशेष - 7 March in History
७ मार्च दिनविशेष - 7 March in History

हे पृष्ठ 7 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 7th March. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • शिक्षक दिन : आल्बेनिया.

महत्त्वाच्या घटना:

१७७१: हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली.

१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले.

१९३६: दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्‍हाईनलँडमधे सैन्य घुसवले.

१९८३: नवी दिल्ली येथे सातव्या अलिप्त राष्ट्रपरिषदेस आजच्याच दिवशी सुरुवात झाली.

२००६: लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.

२००९: केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१५०८: हुमायून – दुसरा मुघल सम्राट (मृत्यू: १७ जानेवारी १५५६)

१७६५: फोटोग्राफी चे शोधक निसेफोरे नाऐप्से यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै १८३३)

१७९२: सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक (मृत्यू: ११ मे १८७१)

१८४९: ल्यूथर बरबँक – महान वनस्पतीतज्ञ (मृत्यू: ११ एप्रिल १९२६)

१९११: सच्‍चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (मृत्यू: ४ एप्रिल १९८७ – नवी दिल्ली)

१९१८: मराठी साहित्यिक स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर यांचा जन्म.

१९३४: नरी कॉन्ट्रॅक्टर – भारताचा यष्टिरक्षक

१९४२: उमेश कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९५२: सर विवियन रिचर्ड्‌स – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू

१९५५: अनुपम खेर – चित्रपट अभिनेता

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६४७: दादोजी कोंडदेव – छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू (जन्म: ?? १५७७)

१९२२: गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते, शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या (जन्म: १५ ऑगस्ट १८६७)

१९५२: परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ.

१९५७: मागासवर्गीयांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कुमाँऊ परिषदेची स्थापना केली. (जन्म: १० सप्टेंबर १८८७)

१९६१: गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे चौथे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पहाडी पुरूष, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष, भारतरत्‍न

१९७४: माजी अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी यांचे निधन.

१९९३: इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (जन्म: २६ आक्टोबर १९००)

२०००: प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक (जन्म: २९ आक्टोबर १९३१)

२०१२: रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (जन्म: ३ मार्च १९२६)

२०१५: भारतीय वकील आणि राजकारणी जी. कार्तिकेयन यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १९४९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

2 Comments

  1. गोविंद वल्लभ पंत हे भारताचे दुसरे नव्हे तर चौथे गृहमंत्री होते…

    आपण त्यांना दुसरे गृहमंत्री म्हटले आहे त्यात दुरुस्ती करावी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *