२० जानेवारी दिनविशेष - 20 January in History
२० जानेवारी दिनविशेष - 20 January in History

हे पृष्ठ 20 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २० जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 20 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

गिरीश कर्नाड
गिरीश कर्नाड

१७८८: इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्‍यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.

१८४१: ब्रिटिशांनी हाँगकाँग बेटाचा ताबा घेतला.

१९३७: फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.

१९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने बर्लिनवर २३०० टन बॉम्बवर्षाव केला.

सतारवादक पं. रविशंकर
सतारवादक पं. रविशंकर

१९४८: महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्‍न झाला. याआधी १९३४, १९४४ व १९४४ मध्ये त्यांची हत्या करण्याचे प्रयत्‍न झाले होते.

१९५७: आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.

१९६३: चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.

बराक ओबामा
बराक ओबामा

१९६९: क्रॅब नेब्युलात प्रथमत: पल्सार दिसून आला.

१९९८: संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ’पोलार संगीत पुरस्कार’ विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर

१९९९: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

२००९: अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

आपा शेर्पा
आपा शेर्पा

१७७५: आंद्रे अ‍ॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १० जून १८३६)

१८६१: मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म.

१८७१: सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (मृत्यू: ५ सप्टेंबर १९१८)

१८८९: महान देशभक्त आणि तपस्वी मसुरकर महाराज यांचा जन्म.

१८९८: कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार, त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. ’वंदे मातरम’ला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली. (मृत्यू: २० आक्टोबर १९७४)

१९३०: चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांचा जन्म.

१९६०: आपा शेर्पा – १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

रामेश्वरनाथ काओ
रामेश्वरनाथ काओ

१८९१: डेविड कालाकौआ – हवाईचा राजा (जन्म: १६ नोव्हेंबर १८३६)

१९३६: जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: ३ जून १८६५)

१९५१: अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (जन्म: २९ नोव्हेंबर १८६९)

१९८०: कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ – १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या. (जन्म: १९ डिसेंबर १८९४)

खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी
खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी

१९८८: खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी’ (जन्म: ३ जून १८९०)

१९९३: ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी, ’रोमन हॉलिडे’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. (जन्म: ४ मे १९२९)

२००२: रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते. (जन्म: १० मे १९१८)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *