२१ जानेवारी दिनविशेष - 21 January in History
२१ जानेवारी दिनविशेष - 21 January in History

हे पृष्ठ 21 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २१ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 21 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • राष्ट्रीय आलिंगन दिन.

महत्त्वाच्या घटना:

ड्यूक ऑफ एडिंबरो
ड्यूक ऑफ एडिंबरो

१७६१: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.

१७९३: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.

१८०५: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.

१८४६: डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांचा संपादनाखाली प्रकाशित झाला.

१९५८: कॉपीराईट चा नियम आजच्या दिवशीच लागू केला गेला.

१९६१: इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट

१९७२: मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा मिळाला.

२०००: ’फायर अँड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.

२००९: भारतीय वायुसेनेचे सूर्यकिरण नावाच्या एका प्रशिक्षण विमानाचा कर्नाटक च्या बिदर येथे अपघात झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८८२: वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (मृत्यू: २० जुलै १९४३)

शांताराम आठवले
शांताराम आठवले

१८९४: माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३९)

१९१०: शांताराम आठवले – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार. ’भाग्यरेखा’, ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ वगैरे अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. ’संत तुकाराम’ चित्रपटातील ’आधी बीज एकले’ हा अभंग त्यांनी रचला आहे. परंतु लोकांना हा अभंग तुकारामांचाच आहे असे वाटते. (मृत्यू: २ मे १९७५)

१९२२: पंजाब चे माजी मुख्यमंत्री हरचरण सिंग ब्रर यांचा जन्म.

१९२४: प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ (मृत्यू: १२ नोव्हेंबर २००५)

पॉल अ‍ॅलन
पॉल अ‍ॅलन

१९४३: प्रसिद्ध भारतीय लेखिका प्रतिभा राय यांचा जन्म.

१९५२: भारतीय चित्रपट अभिनेता प्रदीप रावत यांचा जन्म.

१९५३: पॉल अ‍ॅलन – मायक्रोसॉफ्टचा एक संस्थापक

१९८६: भारतीय चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत चा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७९३: लुई (सोळावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २३ ऑगस्ट १७५४)

१९०१: अलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक (जन्म: २ ऑगस्ट १८३५)

१९२४: ब्लादिमिर लेनिन – रशियन क्रांतिकारक (जन्म: २२ एप्रिल १८७०)

हेमू कलाणी
हेमू कलाणी

१९४३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. (जन्म: २३ मार्च १९२३)

१९४५: रास बिहारी घोष – क्रांतिकारक (जन्म: २५ मे १८८६)

१९५०: एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार (जन्म: २५ जून १९०३)

१९५९: सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक

हरिकीर्तन कौर ऊर्फ ’गीता बाली
हरिकीर्तन कौर ऊर्फ ’गीता बाली

१९६३: ला भारतीय प्रसिद्ध कादंबरीकार शिवपूजन सहाय यांचे निधन.(जन्म: १२ ऑगस्ट १८८१)

१९६५: हरिकीर्तन कौर ऊर्फ ’गीता बाली’ – अभिनेत्री (जन्म: ? ? १९३०)

१९९७: ला भारताचे माजी नौदल प्रमुख सुरेंद्रनाथ कोहली यांचे निधन.

१९९८: सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (जन्म: २१ जून १९१६)

२०१६: ला भारताची प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *