हे पृष्ठ 5 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 5 February. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१२९४: अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.
१६७०: सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली.
१७६६: माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट
१९१९: चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.
१९२२: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
१९४५: दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले.
१९४८: गांधी हत्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.
१९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
१९५३: आजच्या दिवशी वॉल्ट डिज़्नी यांची पीटर पॅन मूवीचा प्रीमियर ची सुरुवात झाली.
१९५८: ७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
१९६१: आजच्या दिवशी संडे “टेलिग्राफ न्यूज” चा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.
१९७१: आजच्या दिवशी अपोलो-१४ अंतरीक्ष यान चंद्रावर उतरून अंतराळवीर सुद्धा चंद्रावर उतरले.
१९९९: नेल्सन मंडेला यांनी संसद मध्ये त्यांचे शेवटचे भाषण दिले आणि मे महिन्यात त्यांनी पदाचा त्याग केला.
२००३: भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
२००४: ’पुण्याची’ स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.
२००७: सुनिता विल्यम्स हि अंतराळात जास्त वेळ राहणारी पहिली भारतीय महिला बनली.
२०१०: आजच्या दिवशी अभिनव बिंद्रा ने नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय शुटींग चॅम्पियनशिप मध्ये ६०० पैकी ५९६ अंक मिळवून सुवर्ण पदक स्वतःच्या नावावर केले.
२०१६: ला आजच्या दिवशी वित्त मंत्रालयाने युटूब चॅनेल सुरु केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७८८: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट पील यांचा जन्म.
१८४०: जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (मृत्यू: २३ आक्टोबर १९२१)
१९०५: अच्युतराव पटवर्धन – स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)
१९१४: शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९४)
१९१६: भारतीय कवी जानकी वल्लभ शास्त्री यांचा जन्म.
१९१९: देशाचे पहिले मुस्लीम विदेश मंत्री खुर्शीद आलम खान यांचा जन्म.
१९३३: गिरीजा कीर – लेखिका आणि कथाकथनकार
१९३६: बाबा महाराज सातारकर – कीर्तनकार
१९४९: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचा जन्म.
१९७६: अभिषेक बच्चन – अभिनेता
१९९०: ला भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमार चा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९२०: आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधि घेतली. (जन्म: १४ सप्टेंबर १८६७)
१९२७: हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (जन्म: ५ जुलै १८८२)
१९९९: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध नर्तकी इंद्राणी रहमान यांचे निधन.
२०००: कालिंदी केसकर – गायिका (जन्म: ? ? ????)
२००३: गणेश गद्रे – ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या ‘हरिजन’ या मराठी अंकाचे संपादक (जन्म: ? ? ????)
२००८: महर्षी महेश योगी – योग गुरू (जन्म: १२ जानेवारी १९१७)
२०१०: सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: ७ फेब्रुवारी १९३४)
आपण १९४८ साली गांधी वधानंतर असे लिहले आहे
गांधी वध नव्हे तर गांधी हत्या असे लिहावे
होय. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आम्ही बदल केले आहेत.