शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते
शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते

हे पृष्ठ 23 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 23 October. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

हरी नारायण आपटे
हरी नारायण आपटे

१९९७ : सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान

१९७३ : संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.

१९४४ : दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.

१८९० : हरी नारायण आपटे यांनी ’करमणूक’ या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

संगीतभूषण’ पं. राम मराठे
संगीतभूषण’ पं. राम मराठे

१९४५ : शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते (मृत्यू: १३ मार्च १९९६)

१९२४ : ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट (मृत्यू: ४ आक्टोबर १९८९)

१९२३ : दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)

१९०० : डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: १८ जून १९५८)

१८७९ : शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५२)

१७७८ : चन्नम्मा – कित्तूरची राणी (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

सुनील गंगोपाध्याय
सुनील गंगोपाध्याय

२०१२ : सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)

१९२१ : जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)

१९१५ : डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १८ जुलै १८४८)

१९१० : चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा (जन्म: २० सप्टेंबर १८५३)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.