१३ एप्रिल दिनविशेष - 13 April in History
१३ एप्रिल दिनविशेष - 13 April in History

हे पृष्ठ 13 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 13th April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६४८: दिल्ली येथील लाल किल्ल्याची निर्मिती झाली.

१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.

१७३१: इतिहासप्रसिध्द वारणेचा तह होऊन शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याचे दोन भाग झाले

१७३१: छत्रपती शाहू (सातारा) आणि छत्रपती संभाजी (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरुन असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला. [चैत्र व. २]

१७७२: वॉरन हेस्टींग्ज यांची गव्हर्नर जनरल म्हणून कलकत्ता येथे नेमणूक

१८४९: हंगेरी प्रजासत्ताक बनले.

१९१९: जालियानवाला बागची कत्तल – भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती.

१९३९: भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.

१९४२: व्ही. शांताराम ’प्रभात फिल्म कंपनी’तून बाहेर पडले.

१९४८: भुवनेश्वर ही ओरिसा राज्याची राजधानी करण्यात आली.

१९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.

१९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.

२०००: प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता ह्या विश्वसुंदरी बनल्या.

२०१७: इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वारणा नदीवर आधारित ‘अमृत’ योजनेचा प्रारंभ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केला गेला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७४३: थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपाध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री. त्यांनी मांडलेल्या विचारांवर अमेरिकेची राज्यघटना आधारित असून तेथील लोकशाहीला ’जेफरसनची लोकशाही’ असे म्हणतात. (मृत्यू: ४ जुलै १८२६)

१८९०: भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता तसचं, भारतातील विशिष्ट लांबीचा चित्रपट ‘श्री पुंडलिक’ चे निर्माता रामचंद्र गोपाळ उर्फ “दादासाहेब” तोरणे यांचा जन्मदिन.

१८९५: वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे (मृत्यू: २९ आक्टोबर १९७८)

१८९८: प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व पटकथा लेखक चंदूलाल शाह यांचा जन्मदिन.

१९०५: ब्रूनो रॉस्सी – पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्‍या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९९३ – केम्ब्रिज, मॅसेच्युसेटस, यू. एस. ए.)

१९०६: सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक (मृत्यू: २२ डिसेंबर १९८९)

१९१३: दत्ताजी ताम्हाणे, स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत. मृत्यू

१९२२: ज्यूलिअस न्येरेरे – टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ आक्टोबर १९९९)

१९२५: स्वातंत्र्यपूर्व भारताच्या ब्रिटीश राजवटीमधील सक्रीय स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध चित्रपट गीतकार वर्मा मलिक यांचा जन्मदिन.

१९४०: नजमा हेपतुल्ला – राज्यसभा सदस्य

१९५६: सतीश कौशिक – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक

१९६३: गॅरी कास्पारॉव्ह – रशियन बुद्धीबळपटू

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

अनंत काकबा प्रियोळकर.

१९५१: भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते (जन्म: २४ आक्टोबर १८६८)

१९७३: बलराज सहानी – अभिनेता व दिग्दर्शक (जन्म: १ मे १९१३)

१९८८: हिरामण बनकर – महाराष्ट्र केसरी

१९९९: डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले – कृषीतज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: ? ? ????)

२०००: विश्वास नरहर तथा ’बाळासाहेब’ सरपोतदार – चित्रपट निर्माते व वितरक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष (जन्म: ? ? ????)

२००७: सुप्रसिद्ध भारतीय कवी, समीक्षक, अनुवादक आणि शास्त्रीय साहित्याचे प्रतिपादक मल्लमपल्ली सरभेश्वर सरमा उर्फ ‘सरभ्याय’ यांचे निधन.

२००८: दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *