हे पृष्ठ 29 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 29 October. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

मोगूबाई कुर्डीकर
मोगूबाई कुर्डीकर

२००८ : डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.

२००५ : दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार

१९९९ : चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान

१९९७ : माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकर‍त्‍न पुरस्कार‘ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर

१९९७ : अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा ‘एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार‘ जाहीर

१९९६ : स्वदेशात बनविलेली ‘कामिनी‘ ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्‍कम येथे कार्यान्वित करण्यात आली. युरेनिअम-२३३ हे इंधन वापरणारी ही आशियातील पहिली अणूभट्टी आहे.

१९९६ : मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड

१९९४ : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा ’होमी भाभा पुरस्कार’ डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर

१९६४ : टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.

१९५८ : महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान

१९२२ : बेनिटो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी

१८९४ : महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना

जोसेफ गोबेल्स
जोसेफ गोबेल्स

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७१ : मॅथ्यू हेडन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९३१ : प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक (मृत्यू: ७ मार्च २०००)

१८९७ : जोसेफ गोबेल्स – जर्मनीचा चॅन्सेलर व नाझी नेता (मृत्यू: १ मे १९४५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

कमलादेवी चट्टोपाध्याय
कमलादेवी चट्टोपाध्याय

१९८८ : कमलादेवी चट्टोपाध्याय – मॅगसेसे पुरस्कार विजेत्या (१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ३ एप्रिल १९०३)

१९८१ : दादा साळवी – अभिनेते (जन्म: ? ? ????)

१९७८ : वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे (जन्म: १३ एप्रिल १८९५)

१९३३ : पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ (जन्म: ५ डिसेंबर १८६३)

१९११ : जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्‍यांना देण्यात येणार्‍या पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक (जन्म: १० एप्रिल १८४७)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.