हे पृष्ठ 30 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 30 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- जागतिक बचत दिन
महत्त्वाच्या घटना:
१९२०: सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.
१९२८: लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यातच पुढे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा अंत झाला.
१९४५: भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.
१९६०: ब्रिटन मध्ये पहिल्यांदा किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले.
१९६६: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.
१९७३: इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.
१९९५: कॅनडातील क्वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.
२०१३: सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला. हरयाणाविरुद्ध झालेल्या या सामन्यात सचिनने विजयी फटका मारला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७३५: जॉन अॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ४ जुलै १८२६)
१८५३: ब्रिटीश कालीन भारतातील प्रशासकीय अधिकारी व राष्ट्रवादी तसचं, भारतीय क्रांतिकारक संस्था अनुशीलन समितीचे प्रारंभिक सदस्य प्रमथनाथ मित्र(Pramathanath Mitra) यांचा जन्मदिन.
१८८७: सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि ’संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील (मृत्यू: १० सप्टेंबर १९२३)
१९०९: डॉ. होमी जहांगीर भाभा – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ जानेवारी १९६६)
१९२१: मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राजकारणी भाई महावीर यांचा जन्मदिन.
१९३२: भारतीय इतिहासकार आणि लेखक बरुन डी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै २०१३)
१९४९: प्रमोद महाजन – केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार (मृत्यू: ३ मे २००६)
१९५१: भारतीय ड्रमर आणि गीतकार त्रिलोक गुर्टू यांचा जन्म.
१९६०: डिएगो मॅराडोना – अर्जेंटिनाचा फूटबॉलपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८८३: भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४)
१९७४: बेगम अख्तर – गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. (जन्म: ७ आक्टोबर १९१४)
१९८४: प्रसिद्ध चित्रपट निर्माता, लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार ख्वाजा खुर्शीद अन्वर यांचे निधन.
१९९०: व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (जन्म: १८ नोव्हेंबर १९०१)
१९९०: विनोद मेहरा – अभिनेता (जन्म: १३ फेब्रुवारी १९४५)
१९९४: सरदार स्वर्ण सिंग – केन्द्रीय मंत्री (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)
१९९६: प्रभाकर नारायण ऊर्फ ’भाऊ’ पाध्ये – लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते (जन्म: २९ नोव्हेंबर १९२६)
१९९८: विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक (जन्म: १३ ऑगस्ट १९०६)
२००५: भारतीय राजकारणी शम्मीशेर सिंह शेरी यांचे निधन.
२०११: अरविंद मफतलाल – उद्योगपती (जन्म: २७ आक्टोबर १९२३)
२०१४: सुप्रसिद्ध भारतीय साहित्यकार रॉबिन शॉ(Robin Shaw) यांचे निधन.