कतरिना कैफ
कतरिना कैफ

हे पृष्ठ 16 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १६ जुलै  रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 16 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

डॉ. शंकरदयाळ शर्मा
डॉ. शंकरदयाळ शर्मा

६२२: प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. चंद्रावर आधारित असलेल्या इस्लामिक (हिजरी) कॅलेंडरची या दिवसापासुन सुरूवात झाली.

१९४५: अमेरिकेने तयार केलेल्या अणूबॉम्बची न्यू मेक्सिकोमधील लास अलमॉस येथील वाळवंटात चाचणी

१९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.

१९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणार्‍या ’अपोलो-११’ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथुन प्रक्षेपण

१९९२: भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. तत्पुर्वी ते उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते.

१९९८: गुजराथमधे शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याचा अधिकार आहे; असा निर्णय घेतल्याची माहिती गुजराथच्या शिक्षण राज्यमंत्री श्रीमती आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत दिली.

आनंदीबेन पटेल
आनंदीबेन पटेल

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७७३: सर जोशुआ रेनॉल्ड्स – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष, व्यक्तिचित्रे काढण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १७९२ – लंडन, इंग्लंड)

१९०९: अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (मृत्यू: २९ जुलै १९९६)

१९२३: के. व्ही. कृष्णराव – भूदल प्रमुख, जम्मू काश्मीर, नागालँड, मणिपूर व त्रिपूराचे राज्यपाल

शॉन पोलॉक
शॉन पोलॉक

१९१३: स्वामी शांतानंद सरस्वती – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य (मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ – अलाहाबाद, उत्तर प्रदेश)

१९१४: वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – साहित्यिक (लघुकथा, लोककथा, बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९९५)

१९१७: जगदीश चंद्र माथूर – नाटककार व लेखक (मृत्यू: १४ मे १९७८)

धनराज पिल्ले
धनराज पिल्ले

१९४३: प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक (मृत्यू: ६ जानेवारी २०१०)

१९६८: धनराज पिल्ले – हॉकी पटू

१९७३: शॉन पोलॉक – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू

१९८४: कतरिना कैफ – चित्रपट कलाकार

अरुणा असफ अली
अरुणा असफ अली

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१३४२: चार्ल्स (पहिला) – हंगेरीचा राजा (जन्म: ? ? १२८८)

वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे
वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे

१९८६: वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४)

उस्ताद निसार हुसेन खाँ
उस्ताद निसार हुसेन खाँ

१९९३: उस्ताद निसार हुसेन खाँ – पद्मभूषण (१९७०), रामपूर साहसवान घराण्याचे तराणा व ख्यालगायक, संगीत संशोधन अकादमीचे (SRA) निवासी शिक्षक, आकाशवाणी कलाकार, उस्ताद राशिद खाँ यांचे गुरू (जन्म: ? ? १९०९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *