हे पृष्ठ 7 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ७ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 7 December. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • International Civil Aviation Day

महत्त्वाच्या घटना:

यू. आर. अनंतमूर्ती
यू. आर. अनंतमूर्ती

१९९८ : ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड

१९९५ : फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन ’इन्सॅट-२सी’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण १९९४ : कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर १९८८ : यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.

१९७५ : इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.

विश्वनाथ वामन तथा वसंत बापट
विश्वनाथ वामन तथा वसंत बापट

१९४१ : दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.

१९३५ : ’प्रभात’चा धर्मात्मा हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपटमुंबईतील ’कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला. हा चित्रपट ’प्रभात’ व बालगंधर्व यांनी ’बालगंधर्व-प्रभात’ या संयुक्त बॅनरखाली बनवला होता.

१९१७ : पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.

१८५६ : भारतातील पहिला उच्‍चवर्णीय विधवा विवाह कोलकत्त्यात संपन्न झाला.

१८२५ : बाष्पशक्तीवर चालणारे ’एंटरप्राईज’ नावाचे जहाज कोलकाता बंदरात दाखल झाले. भारतात आलेले अशा प्रकारचे ते पहिले जहाज होते.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी.‘ नवले
जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी.‘ नवले

१९५७ : जिऑफ लॉसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९२१ : प्रमुख स्वामी महाराज – स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू

१९०२ : जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी.‘ नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक (मृत्यू: ७ सप्टेंबर १९७९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे
भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे

१९९७ : ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन (जन्म: १६ जुलै १९१३ – अच्छाती, बस्ती, उत्तर प्रदेश)

१९८२ : बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक? (जन्म: १७ जून १९०३)

१९७६ : डॉ. गोवर्धनदास पारिख – विचारवंत आणि शिक्षणतज्ञ (जन्म: ? ? ????)

१९४१ : भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी (जन्म: २७ आक्टोबर १८७४)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.