शर्मिला टागोर
शर्मिला टागोर

हे पृष्ठ 8 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ८ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 8 December. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • जपानमध्ये हा दिवस बोधी दिवस (Bodhi Day) म्हणून साजरा केला जातो.

महत्त्वाच्या घटना:

मानाजी आंग्रे
मानाजी आंग्रे

१९७१ : भारत पाक युद्ध – भारतीय आरमाराने पाकिस्तानातील कराची बंदरावर हल्ला केला.

१९४१ : दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलँड, हाँगकाँग, फिलिपाइन्स व डच इस्ट इंडिज वर हल्ला केला. याच्या एकच दिवस आधी जपानने अमेरिकेतील पर्ल हार्बरवर हल्ला चढवला होता.

१७४० : दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला. मानाजी आंग्रे आणि खंडोजी मानकर यांच्या नेतृत्वाखाली मराठी आरमाराने हा विजय मिळवला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

धर्मेन्द्र
धर्मेन्द्र

१९४४ : शर्मिला टागोर – चित्रपट अभिनेत्री

१९३५ : धर्मेन्द्र – चित्रपट अभिनेता

१९०० : उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२) व फेलोशिप विजेते. त्यांनी अल्मोडा येथे ’इंडिया कल्चरल सेंटर’ची स्थापना केली. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९७७)

पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’
पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’

१८९७ : पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी. हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्‍न केले. (मृत्यू: २९ एप्रिल १९६०)

१८७७ : नारायण सदाशिव मराठे तथा ’केवलानंद सरस्वती’ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक (मृत्यू: १ मार्च १९५५)

१७६५ : एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक (मृत्यू: ८ जानेवारी १८२५)

१७२१ : बाळाजी बाजीराव तथा ’नानासाहेब पेशवा’ (मृत्यू: २३ जून १७६१)

गोल्डा मायर
गोल्डा मायर

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९७८ : गोल्डा मायर – शिक्षिका व इस्त्रायलच्या ४ थ्या पंतप्रधान (जन्म: ३ मे १८९८)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.