६ डिसेंबर दिनविशेष - 6 December in History
६ डिसेंबर दिनविशेष - 6 December in History

हे पृष्ठ 6 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ६ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 6 December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • महापरिनिर्वाण दिन

महत्त्वाच्या घटना:

१७६८: एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१८७७: द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.

१८९७: परवाना टॅक्सीकॅब सुरु करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.

१९१७: फिनलँड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.

१९७१: भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.

डॉ. एस. झेड. कासिम
डॉ. एस. झेड. कासिम

१९७८: स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.

१९८१: डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली ’पोलर सर्कल’ या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली. ९ जानेवारी १९८२ रोजी रात्री साडेबारा वाजता अंटार्क्टिकावर पोचली. भारत हा अंटार्क्टिका मोहीम करणारा तेरावा देश बनला.

१९९२: अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.

१९९७: जपान च्या क्योटो मध्ये आंतरराष्ट्रीय हवामान परिषदच्या सम्मेलनाचे उद्घाटन.

१९९८: बँकॉक मध्ये १३ वी आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात.

१९९८: ह्यूगो चावेझ यांना व्हेनेझुएला चे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले.

डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे
डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे

१९९९: जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ’ऑलिम्पिक ऑर्डर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

२०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

२००६: ला नासाने मार्स ग्लोबल सर्वेयर ने काढलेले फोटो सार्वजनिक केले.

२००७: ला ऑस्ट्रेलिया च्या शाळेमध्ये शीख विध्यार्थ्यांना कृपाण आणि मुस्लीम विध्यार्थ्यांना हिजाब नेण्यास परवानगी मिळाली होती.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१४२१: हेन्‍री (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २१ मे १४७१)

१७३२: वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (मृत्यू: २२ ऑगस्ट १८१८)

१८२३: मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत (मृत्यू: २८ आक्टोबर १९००)

’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार
’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार

१८६१: रेव्हरंड नारायण वामन तथा ना. वा. टिळक – कवी व लेखक (मृत्यू: ९ मे १९१९)

१८५३: हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३१)

१९१६: ’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९२)

१९१७: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे २००८)

१९२३: वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार (मृत्यू: १५ आक्टोबर २००२)

कमलेश्वर
कमलेश्वर

१९३२: कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (मृत्यू: २७ जानेवारी २००७)

१९४५: अभितेने शेखर कपूर यांचा जन्म.

१९४८: भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांचा जन्म.

१९८५: भारतीय क्रिकेटपटू आर. पी. सिंग यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक
क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक

१८९२: सीमेन्स कंपनीचे संस्थापक वर्नेर व्होंन सीमेन्स यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८१६)

१९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. (जन्म: १४ एप्रिल १८९१)

१९७१: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९०२)

१९७६: क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (जन्म: ३ ऑगस्ट १९००)

नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’
नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’

१९९८: ला परमवीर चक्र विजेता मेजर होशियार यांना वीरमरण.

२००९: ला भारतीय अभिनेत्री बिना राय यांचे निधन.

२०१३: नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १८ जुलै १९१८)

२०१५: ला भारतीय चित्रपट अभिनेता राम मोहन याचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *