हे पृष्ठ 5 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that occurred on 5th May. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- भारतीय आगमन दिन : गुयाना, १८३८ पासून.
- आंतरराष्ट्रीय सुईण दिन.
- मुक्ति दिन : डेन्मार्क, नेदरलँड्स, इथियोपिया.
- बाल दिन : जपान, दक्षिण कोरिया.
- सिंको दे मायो : मेक्सिको, अमेरिका.
- शहीद दिन : आल्बेनिया.
महत्त्वाच्या घटना:
१२६०: कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.
१८८३: राष्ट्रीय चळवळीचे संस्थापक तसचं, एक पत्रकार म्हणून कर्तव्य बजावत असतांना तुरुंगात जाणारे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे पहिले भारतीय पत्रकार ठरले.
१८९३: न्यूयॉर्क शेरबाजाराचा निर्देशांक कोसळला. देशभर मंदीस सुरुवात.
१९०१: विष्णू दिगंबर पलुस्करबुवा यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
१९२०: पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर पॅरिसमध्ये रेड क्रॉस अँड रेड क्रेसेंट सोसायटीज (आयएफआरसी) या आंतरराष्ट्रीय महासंघाची स्थापना करण्यात आली.
१९३६: इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.
१९४४: महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका.
१९५५: पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्त्व प्राप्त झाले.
१९६४: युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.
१९९७: जयदीप आमरे या साडेपाच वर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.
१९९९: दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.
२००५: ब्रिटन देशांतील लेबर पार्टीचे नेता टोनी ब्लेयर यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
२०१०: इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी(विद्यापीठ) ने (इग्नू) सर्व कोर्समधील लैंगिक कामगार आणि त्यांच्या आश्रीतांचे शुल्क माफ करण्याची घोषणा केली.
२०१७: सार्क उपग्रह म्हणून ओळखला जाणारा दक्षिण एशिया उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
८६७: उडा – जपानी सम्राट (मृत्यू: १९ जुलै ९३१)
१४७९: गुरू अमर दास – शिखांचे तिसरे गुरू (मृत्यू: १ सप्टेंबर १५७४)
१८१८: कार्ल मार्क्स – जर्मन तत्त्वज्ञ व कम्युनिझमचे प्रणेते (मृत्यू: १४ मार्च १८८३)
१८६४: निले ब्लाय उर्फ एलिझाबेथ जेन कोचरन शोध्पात्राकारितेच्या जनक यांचा पीट्सबर्ग येथे जन्म.
१९११: भारतीय शिक्षक व कार्यकर्ते प्रितलाता वडेदार यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९३२)
१९१६: ग्यानी झैलसिंग – भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री (मृत्यू: २५ डिसेंबर १९९४)
१९२९: ब्रिटीश कालीन भारतातील प्रसिद्ध क्रांतिकारक अब्दुल हम्मिद कैसर यांचा जन्मदिन.
१९३५: राष्ट्रीय पुरस्कार तसचं, हिंदी साहित्य संस्था व गुजरात गौरव पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रकार, लेखक, व्यंगचित्रकार, पत्रकार, पर्यावरणवादी, नाटककार आणि पटकथा लेखक आबिद सुरती यांचा जन्मदिन.
१९३७: परमवीर चक्र सन्मानित भारतीय सैन्य अधिकरी कर्नल होशियार सिंह यांचा जन्मदिन.
१९५४: भारतीय जनता पक्षाचे राजकीय नेता व हरियाणा राज्याचे विद्यमान (१० वे) मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा जन्मदिन.
१९७०: प्रसिद्ध भारतीय नेमबाज समरेश जंग यांचा जन्मदिन.
१९८९: लक्ष्मी राय तमिळ अभिनेत्री यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८२१: नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.
१८२१: फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट याचे सेंट हेलेना बेटावर निधन (जन्म: १५ ऑगस्ट १७६९)
१९१८: त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ ‘बालकवी’, मराठीतील प्रसिध्द कवी.
१९१८: त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ ’बालकवी’ यांना जळगावजवळील भादली स्टेशनपाशी रेल्वेचे रूळ ओलांडताना आगगाडीखाली सापडून मरण आले. (जन्म: १३ ऑगस्ट १८९०)
१९४३: रामकृष्णबुवा वझे – गायक नट, बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले. केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, भालचंद्र पेंढारकर, हरिभाऊ घांग्रेकर हे त्यांचे काही नामांकित विद्यार्थी होत. (जन्म: २८ नोव्हेंबर १८७२)
१९४५: पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.
१९८९: नवल होर्मुसजी टाटा – उद्योगपती, पद्मभूषण [१९६९] (जन्म: ३० ऑगस्ट १९०४ – मुंबई)
२०००: वि. मा. कुलकर्णी – मुलांच्या समस्यांचे अभ्यासक व समाजशास्त्रज्ञ (जन्म: ? ? ????)
२००६: नौशाद अली – संगीतकार (जन्म: २५ डिसेंबर १९१९)
२००७: लेसर चे निर्माते थिओडोर हेरॉल्ड मॅमन यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९२७)
२००८: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९१७)
२०१२: भारतीय क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९३७)
२०१७: भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला लीला सेठ यांचे निधन.