२३ सप्टेंबर दिनविशेष - 23 September in History
२३ सप्टेंबर दिनविशेष - 23 September in History

हे पृष्ठ 23 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २३ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 23 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

१. International Day Of Sign Languages

महत्त्वाच्या घटना:

१६४१: साली सहा हजार करोड पेक्षा जास्त सोन्या चांदीने भरलेला रॉयल मर्चंट जहाज इंग्लंडच्या दक्षिणी पश्चिमी समुद्री भागात बुडाला.

१८०३: दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.

महात्मा फुले
महात्मा फुले

१८४६: अर्बेन ली व्हेरिअर व त्याच्या २ सहकार्‍यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करुन शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.

१८७३: महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

१८८४: महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली.

१८८९: साली विडियो गेम बनविणारी अमेरिकन विश्व प्रसिद्ध कंपनी निनट्याडो ची स्थापना करण्यात आली.

१९०५: आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी ‘कार्लस्टॅड’ कराराद्वारे अलग होण्याचा निर्णय घेतला.

१९०८: कॅनडातील ’युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा’ ची स्थापना

१९३२: हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.

१९८३: ’सेंट किट्स आणि नेव्हिस’चा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

१९९२: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस इंद्रजित गुप्ता “उत्कृष्ट संसदपटू’साठीचा “गोविंद वल्लभ पंत पुरस्कार’ पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या हस्ते प्रदान.

२००२: ’मोझिला फायरफॉक्स’ या ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.

२००३: भारतीय वंशाच्या मीरा नायर यांची आशिया अमेरिकी साहित्य पुरस्कारासाठी निवड. त्यांच्या “व्हीडिओ ः स्टोरीज’ या पुस्तकात स्थलांतराबाबतच्या अनुभवांचे कथन करण्यात आले आहे.

२००४: योकोहामा (जपान) येथील मैदानी स्पर्धेत भारताच्या अंजू जॉर्जने रशियाची ऑलिंपिक विजेती तात्याना लेबेदेवाचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१२१५: कुबलाई खान – मंगोल सम्राट (मृत्यू: १८ फेब्रुवारी १२९४)

१७७१: जपानी सम्राट कोकाकु यांचा जन्म.

१८६१: रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (मृत्यू: १२ मार्च १९४२)

१९०३: युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर (मृत्यू: २ जुलै १९५०)

१९०८: रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (मृत्यू: २४ एप्रिल १९७४). भागलपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. केंद्रीय गृहमंत्रालयाचे ते हिंदी भाषाविषयक सल्लागार होते. “संस्कृती के चार अध्याय’ या बृहद्‌ग्रंथात भारतीय संस्कृतीचा त्यांनी विचारप्रवर्तक आढावा घेतला आहे. “रेणुका’, “हुंकार’, “रश्‍मिरथी’, “नीलकुसुम’ हे त्यांचे काही काव्यग्रंथ. त्यांचे “उर्वशी’ महाकाव्य हिंदीमध्ये विवाद्य ठरले.

१९११: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ राप्पल संगमेश्वर कृष्णन यांचा जन्म. त्यांचे प्रमुख संशोधन प्रकाशाचे विखुरणे, वर्णपट विज्ञान, स्फटिकभौतिकी व अणुकेंद्रीय भौतिकी या शाखांतील आहे. त्यांनी एका नवीन प्रकाशकीय परिणामाचा शोध लावला व सैद्धांतिकरीत्या त्याचे व्यापक स्वरूप प्रस्थापित केले. या परिणामाला “कृष्णन परिणाम’ असे नाव प्राप्त झाले आहे.

१९१४: ब्रुनेईचा राजा ओमर अली सैफुद्दीन (तिसरा) यांचा जन्म.

१९१५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ क्लिफर्डशुल यांचा जन्म.

तनुजा - चित्रपट अभिनेत्री
तनुजा – चित्रपट अभिनेत्री

१९१७: साली भारतीय सेंद्रिय रसायनशास्त्री असीमा चटर्जी यांचा जन्मदिन.

१९१९: देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (मृत्यू: १७ डिसेंबर २०१०). त्यांची “अ पायलट सर्व्हे ऑफ शिरुर तालुका – ऍग्रो इंडस्ट्रिअल बॅलन्स’, “क्‍लाइंबिंग अ वॉल ऑफ ग्लास’, “सरदार सरोवर डिबेट’, “ओ नर्मदा’ इ. अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

१९२०: प्रा. भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर – नाट्यकला, विज्ञान, अध्यात्म या सर्व क्षेत्रंत सारख्याच अधिकाराने वावरणारे सव्यसाची व्यक्तिमत्त्व, प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, हौशी प्रायोगिक रंगभूमीचे अध्वर्यू, लेखक, अभिनेते, दिग्दर्शक (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८७).

१९३५: साली प्रसिद्ध भारतीय हिंदी आणि पंजाबी चित्रपट अभिनेता प्रेम चोपडा यांचा जन्मदिन.

कूमार सानू – पार्श्वगायक
कूमार सानू – पार्श्वगायक

१९४३: तनुजा – चित्रपट अभिनेत्री

१९५०: गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय वैद्यकीय सेवाकार्य करणारे डॉ. अभय बंग यांचा जन्म. त्यांना “महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतीय संसद सदस्य संघटनेतर्फे “सत्पाल मित्तल स्मृती पुरस्कार’ डॉ. बंग यांच्या “सर्च’ या संस्थेला मिळाला. “सर्च’ या स्वयंसेवी संस्थेने नवजात मुलांचे आरोग्य या विषयावर आजपर्यंत जे सखोल संशोधन आणि प्रयोग केले आहेत त्याचा सन्मान जागतिक पातळीवर विशेषांक काढून करण्यात आला.

१९५२: अंशुमान गायकवाड – क्रिकेटपटू

१९५७: कूमार सानू – पार्श्वगायक

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८५८: ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी (जन्म: ८ जुलै १७८९)

१८६३: साली ब्रिटीश कालीन भारतातील पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी हरियाणा येथील बंडाचे नेतृत्व करणारे महान क्रांतिकारक राव तुलाराम सिंह यांचे निधन.

१८७०: प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (जन्म: २८ सप्टेंबर १८०३)

१८८२: फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ३१ जुलै १८००)

१९३९: सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचा जनक (जन्म: ६ मे १८५६)

डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ
डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ

१९६४: भार्गवराम विठ्ठल तथा ’मामा’ वरेरकर (जन्म: २७ एप्रिल १८८३). सत्तेचे गुलाम, करीन ती पूर्व, हाच मुलाचा बाप, संन्याशाचा संसार आदी नाटके त्यांनी लिहिली. रवींद्रनाथ टागोर, शरच्चंद्र चट्टोपाध्याय, जेम्स बॅरी, हेन्रिक इब्सेन, विल्यम बॅरेट यांच्या साहित्यकृतींचे मराठी अनुवाद त्यांनी केले. विधवाकुमारी, संसार की संन्यास, धावता धोटा या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांना सरकारने “पद्मविभूषण’ सन्मान प्रदान केला होता.

१९९९: मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर यांचे निधन.

२००४: डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (जन्म: २८ जानेवारी १९२५)

२०१२: कांतिलाल गिरीधारीलाल व्होरा ऊर्फ के. लाल – जादूगार (जन्म: ? ? १९२४)

२०१५: भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९३०)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *