dinvishesh-mpsc-27-april
dinvishesh-mpsc-27-april

हे पृष्ठ 27 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 27th April. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • स्वातंत्र्य दिन : टोगो, सियेरा लिओन.
  • मुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.

महत्त्वाच्या घटना:

११२४: डेव्हिड पहिला स्कॉटलंडच्या राजेपदी.

१२९६: डनबारची लढाई – एडवर्ड पहिल्याने स्कॉटलंडचा पराभव केला.

१५०९: पोप ज्युलियस दुसर्‍याने व्हेनिसला वाळीत टाकले.

१५२१: माक्टानची लढाई – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा फर्डिनांड मॅगेलन फिलिपाईन्समध्ये स्थानिक रहिवाश्यांशी लढताना मृत्युमुखी.

१६६७: अंध व हलाखीत दिवस काढणार्‍या जॉन मिल्टनने आपले महाकाव्य पॅरेडाईझ लॉस्ट १० ब्रिटीश पाउंडला विकले.

१७७३: भारतातील युद्धांच्या खर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीला वाचवण्यासाठी ब्रिटीश संसदेने टी ऍक्ट करून कंपनीला उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.

१८१०: बीथोव्हेनने आपले प्रसिद्ध पियानो संगीत फ्युर एलिझ रचले.

१८१३: १८१२चे युद्ध – अमेरिकेने कॅनडातील ऑन्टारियो प्रांताची राजधानी यॉर्क(आताचे टोरोन्टो शहर) काबीज केली.

१८५४: पुण्याहूनमुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.

१८६१: अब्राहम लिंकनने अमेरिकेत हेबिअस कोर्पसचा मूलभूत हक्क निलंबित केला. यामुळे सरकारला कोणासही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकण्यास मोकळीक मिळाली.

१८६५: अमेरिकन गृहयुद्धातील उत्तरेचे सुटलेले युद्धबंदी घेउन जाणारे जहाज सुलतानावर मिसिसीपी नदीत स्फोट. १,७०० ठार.

१८७८: कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजूरी दिली.

१९०८: लंडनमध्ये चौथे ऑलिंपिक खेळ सुरू.

१९०९: तुर्कस्तानच्या सुलतान अब्दुल हमीद दुसर्‍याची हकालपट्टी. त्याचा भाउ मुरात पाचवा गादीवर.

१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मनीचे सैन्य ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये शिरले.

१९४५: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने फिनलंडमधून पळ काढला.

१९५०: दक्षिण आफ्रिकेत वंशभेद अधिकृत करणारा कायदा मंजूर झाला.

१९६०: टोगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

१९६१: सियेरा लिओनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

१९६२: जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करु लागली.

१९८१: झेरॉक्स पार्कने माउस वापरण्यास सुरुवात केली.

१९९२: सर्बिया व मॉन्टेनिग्रोने एकत्र येउन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकची स्थापना केली.

१९९४: दक्षिण आफ्रिकेत निवडणुका. श्यामवर्णीय व्यक्तिंना मतदान करण्यास प्रथमतः मुभा.

२००५: एरबसने आपले ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक दाखवले.

२०११: अमेरिकेच्या दक्षिण भागातील सहा राज्यांत टोर्नॅडोंचा उद्रेक. ३०० पेक्षा ठार, कोट्यावधी अमेरिकन डॉलरचे नुकसान.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७०१: चार्ल्स इमॅन्युएल तिसरा, सार्डिनीयाचा राजा.

१८२२: युलिसिस एस. ग्रँट, अमेरिकेचा १८वा राष्ट्राध्यक्ष.

१८८३: भार्गवराम विठ्ठल वरेरकर, श्रेष्ठ नाटककार.

१९०९: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.

१९२७: कोरेटा स्कॉट किंग, मार्टिन ल्युथर किंगची पत्नी.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

६३०: अर्देशर तिसरा, पर्शियाचा राजा.

१५२१: फर्डिनांड मॅगेलन, पोर्तुगीझ शोधक.

१६०५: पोप लिओ अकरावा.

१८९८: शंकर बाळकृष्ण दीक्षित, ज्योतिष गणिताचे श्रेष्ठ अभ्यासक.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *