२६ एप्रिल दिनविशेष- 26 April in History
२६ एप्रिल दिनविशेष- 26 April in History

हे पृष्ठ 26 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 26th April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

एकत्रीकरण दिन : टांझानिया.

एकत्रीकरण दिन : टांझानिया.

महत्त्वाच्या घटना:

१४७८: इटलीतील पाझींनी फ्लोरेन्समध्ये चर्चमधील रविवारच्या सामूहिक प्रार्थने दरम्यान लॉरेन्झो दि मेदिची वर हल्ला केला. लॉरेन्झोचा भाउ ज्युलियानी मृत्युमुखी पडला.

१६०७: इंग्लंडचे काही वसाहती केप हेन्री, व्हर्जिनिया येथे पोचले. यांनी पुढे जेम्सटाउन शहर वसवले.

१६५४: यहुदी लोकांना ब्राझील देशातून बाहेर काढून देण्यात आलं.

रशियातील जुन्या प्रख्यात मॉस्को विद्यापीठाची स्थापना.
रशियातील जुन्या प्रख्यात मॉस्को विद्यापीठाची स्थापना.

१७५५: रशियातील जुन्या प्रख्यात मॉस्को विद्यापीठाची स्थापना.

१८०२: नेपोलियन बोनापार्टने फ्रेंच क्रांतीत देशाबाहेर पळून गेलेल्या जहागिरदारांना माफी जाहीर केली व परत फ्रांसमध्ये बोलावले.

१८४१: साली बॉम्बे गॅझेट या इंग्रजी वृत्तपत्राची स्थापना मुंबई येथे करून त्यांचे वृत्तपत्राचे प्रकाशण सर्वप्रथम एका रेशमी कापडावर करण्यात आले.

१८६५: अमेरिकन यादवी युद्ध – दक्षिणेच्या जनरल जोसेफ जॉन्स्टनने उत्तरेच्या विल्यम टेकुमेश शर्मन समोर उत्तर कॅरोलिनातील ड्युरॅम येथे शरणागती पत्करली.

१८६५: अब्राहम लिंकनची हत्या करून पळालेल्या जॉन विल्कस बूथला सैनिकांनी ठार केले.

१९०३: अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.

१९०३: महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिली सुरु केली. तसचं त्यांनी त्या ठिकाणी ब्रिटीश इंडिया असोसिएशन ची स्थापना केली.

१९२५: पॉल फोन हिंडेनबर्ग वायमार प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी.

१९३३: जर्मनीची गुप्त पोलिस यंत्रणा गेस्टापोची रचना.

१९३७: जर्मनीच्या लुफ्तवाफेने स्पेनच्या गर्निका शहरावर बॉम्बफेक केली. याचे परिणाम पाहून ख्यातनाम चित्रकार पाब्लो पिकासोने गर्निका हे जगप्रसिद्ध चित्र काढले.

१९४२: मांचुरियाच्या हॉन्केइको कोलियरी या कोळशाच्या खाणीत स्फोट. १,५४९ कामगार ठार. आत्तापर्यंतचा खाणीत झालेला हा सगळ्यात मोठा अपघात आहे.

१९५६: भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उदघाटन.

१९६२: नासाचे रेंजर ४ हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.

१९६४: टांगानिका व झांझिबार देश एकत्र आले. टांझानियाची रचना.

१९७०: सुवेझ कालवा भागामध्ये पुन्हा एकदा चकमकी सुरू झाल्या. इजिप्त व इस्त्रायल यांचे हवाई हल्ले सुरू झाले. एकमेकांविरुद्धचे शत्रुत्व आणि विभागीय सत्ता संतुलन, हक्क यासाठी सशस्त्र संघर्ष सुरू.

१९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.

१९८६: युक्रेनमध्ये चर्नोबिल अणु भट्टीत अपघात. घातक किरणोत्सर्गाने युरोप, एशियातील अनेक देश प्रभावित.

१९८९: बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.

१९९४: चायना एरलाइन्सचे एरबस ए-३००जातीचे विमान जपानच्या नागोया विमानतळावर कोसळले. २६४ ठार.

१९९५: आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.

२००२: जर्मनीच्या एरफर्ट शहरात रॉबर्ट स्टाइनहाउझरने आपल्या शाळेतील १३ शिक्षक, २ विद्यार्थी व १ पोलिस अधिकार्‍याला ठार मारले.

२००५: २९ वर्षांनी सिरियाची लेबेनॉनमधून माघार.

२००८: जम्मू काश्मीर राज्यात निर्मित ३९० मेगावॅट क्षमता असलेला दुल हस्ती हायडल पॉवर प्रकल्प तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशाला समर्पित केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट.
मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट.

१२१: मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट.

१४७९: वल्लभाचार्य, कृष्णभक्तीचा एक वेगळा पंथ पुष्टिमार्ग स्थापन करणारे थोर पुरुष.

१६४८: पेद्रो दुसरा, पोर्तुगालचा राजा.

१८६४: स्वामी दयानंद सरस्वती यांचे शिष्य तसचं, आर्य समाजातील प्रमुख पाच नेत्यांपैकी एक पण्डित गुरुदत्त विद्यार्थी यांचा जन्मदिन.

१८९४: रुडॉल्फ हेस, नाझी अधिकारी.

१९००: चार्ल्स रिश्टर, अमेरिकन भूशास्त्रज्ञ.

१९०८: सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.

१९१७: आय.एम.पै, अमेरिकन स्थापत्यविशारद.

१९४०: भारतीय मोल्वी आणि राजकारणी मोल्वी इफ्तिखार हुसैन अन्सारी यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर २०१४)

१९४८: अभिनेत्री मौशमी चटर्जी यांचा जन्म.

१९५३: भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री मौसमी चटर्जी याचा जन्मदिन.

१९६३: जेट ली, चीनी अभिनेता.

१९७०: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचा जन्म.

१९८७: प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्देशक, छायाचित्रकार व लेखक नितीन बोस यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

रमाबाई महादेव रानडे.
रमाबाई महादेव रानडे.

११९२: गो-शिराकावा, जपानी सम्राट.

१४८९: अशिकागा योशिहिसा, जपानी शोगन.

१९२०: श्रीनिवास रामानुजन, प्रसिध्द गणिततज्ञ.

१९२४: रमाबाई महादेव रानडे.

विल्यम लॉकवुड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९७६: साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९३०)

१९८२: प्रतिष्ठीत भारतीय हिंदी कवी, लेखक व आलोचक मलयज यांचे निधन.

१९८७: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२)

१९९९: लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान मनमोहन अधिकारी यांचे निधन. (जन्म: २० जून १९२०)

२०१०: राजस्थान राज्याच्या माजी राज्यपाल प्रभाराव याचं निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *