२५ एप्रिल दिनविशेष - 25 April in History
२५ एप्रिल दिनविशेष - 25 April in History

हे पृष्ठ 25 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 25th April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • ऍन्झाक दिन : ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड.
  • क्रांती दिन : पोर्तुगाल.
  • फेस्ता देला लिबरेझियोन (स्वातंत्र्य दिन) : इटली.
  • ध्वज दिन : फेरो द्वीपसमूह, स्वाझीलँड.

महत्त्वाच्या घटना:

१६०७: ८० वर्षांचे युद्ध – नेदरलँड्सने जिब्राल्टरजवळ स्पेनचे आरमार बुडवले.

१७९२: क्लॉड जोसेफ रूगे दि लिलने फ्रेंच राष्ट्रगीत ला मार्सेलची रचना केली.

१८२९: चार्ल्स फ्रीमॅन्टल पश्चिम ऑस्ट्रेलियाला पोचला.

१८४६: मेक्सिको व टेक्सासच्या प्रजासत्ताक मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू.

१८५९: प्रसिध्द सुएझ कालव्याच्या बांधकामास सुरुवात.

१८६२: अमेरिकन यादवी युद्ध – उत्तरेने न्यू ऑर्लिअन्स जिंकले.

१८६७: दक्षिण आफ्रिकेत श्वेत लोकांना मतदान करण्याची अनुमती मिळाली.

१८९८: अमेरिकेने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.

१९०१: अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यात स्वयंचलित वाहनांना नंबरप्लेट लावणे सक्तीचे केले.

१९१५: पहिले महायुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडचे सैन्य तुर्कस्तानमध्ये उतरले.

१९२५: जर्मन सैन्यदलाचे कमांडर जनरल आणि राजकारणी पॉल पॉल लुडविग हंस अँटोन फॉन बेनेकेंडोर्फ अंड वॉन हिंदेनबर्ग यांची राष्ट्रपती पदी नियुक्ती करण्यात आली होती.

१९२६: ईराणमध्ये रझा शाह पहलवी सत्तेवर.

१९४५: दुसरे महायुद्ध – मिलानमधून नाझींची हकालपट्टी.

१९५३: डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला.

१९६६: एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.

१९७४: पोर्तुगालमध्ये जनतेचा उठाव. लोकशाही पुन्हा अमलात.

१९८२: रंगीत दूरदर्शन प्रक्षेपणाला सुरुवात.

१९८३: अंतराळयान पायोनियर १०सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.

१९८६: म्स्वाती तिसरा स्वाझीलँडच्या राजेपदी.

१९८९: श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.

२०००: वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.

२००५: जपानच्या आमागासाकी शहराजवळ रेल्वे अपघात. १०७ ठार.

२००८: जागतिक मलेरिया दिन

२००८: हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार, अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक आमिर खान यांना चित्रपट क्षेत्रांतील आपल्या महत्वपूर्ण योगदानाकरता मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृर्ती प्रतिष्ठान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

२०१५: ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात ९१०० जण मारले गेले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

३२: मार्कस साल्व्हियस ओथो, रोमन सम्राट.

१२१४: लुई नववा, फ्रांसचा राजा.

१२२८: कॉन्राड दुसरा, जर्मनीचा राजा.

१२८४: एडवर्ड दुसरा, इंग्लंडचा राजा.

१५४५: यी सुन शिन, कोरियन दर्यासारंग.

१५९९: ऑलिव्हर क्रॉमवेल, ब्रिटीश राजकारणी, अघोषित राजा.

१७४३: मेवाड प्रांताचे शासक महाराजा महाराणा प्रताप सिंग द्वितीय यांचे पुत्र राजसिंग दुसरा यांचा जन्मदिन.

१७९४: ब्रिटीशकालीन भारतातील हैदराबाद प्रांताचे रियासतदार(शासक)  मुघल शासक मीर फर्कंदा अली खान उर्फ नासिर-उद-दौला यांचा जन्मदिन.

१८१९: भारतातील जयपूर राज्याचे शासक महाराजा जय सिंह यांचा जन्मदिन.

१८७४: गुग्लियेमो मार्कोनी, इटलीचा संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ, रेडिओ संशोधक.

१९००: प्रख्यात ब्रिटिश नागरी सेवक, मुत्सद्दी आणि राजकारणी तसेच संयुक्त राष्ट्र संघाचे माजी कार्यवाहक सरचिटणीस ह्युबर्ट माइल्स ग्लॅडविन जेब यांचा जन्मदिन.

१९०४: भारतीय हिंदी साहित्यकार विद्वान चंद्रबली पाण्डेय यांचा जन्मदिन.

१९१२: भारतीय तमिळ अभ्यासक व लेखक तसचं, तामिळनाडू येथील शैक्षणिक कर्ते  म्यू. वरथराजन यांचा जन्मदिन.


१९१८:
 हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९९३)

१९१९: साली कॉंग्रेस पक्षाचे नेता व उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांचा जन्मदिन.

१९४०: हॉलिवूडमधील अभिनेता अल पचिनो यांचा जन्म.

१९६१: अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक करण राझदान यांचा जन्म.

१९६१: भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक दिनेश डिसोझा यांचा जन्म.

१९६४: भारतीय राजकारणी आर. पी. एन. सिंग यांचा जन्म.

१९६९: अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय व्यावसायिक फुटबॉल खेळाडू कालो हरीन यांचा जन्मदिन.

२००८: जागतिक मलेरिया दिन

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

११८५: अंतोकु, जपानी सम्राट.

१२९५: सांचो चौथा, कॅस्टिलचा राजा.

थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.
थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.

१६०५: नरेस्वान, सयामचा राजा.

१६४४: चॉँगझेंग, चीनी सम्राट.

१७४०: थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.

१८४०: सिमिओन-डेनिस पोइसॉन, फ्रेंच गणितज्ञ.

१९९९: साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचे निधन.

२०००: भारतीय चित्रपट गीतकार, पटकथा आणि कथा लेखक मुखराम शर्मा यांचे निधन.

२००२: लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचे निधन. (जन्म: १२ मे १८९९)

२००३: ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १९१४)

२००५: स्वामी रंगनाथानंद, भारतीय तत्त्वज्ञानी; अध्यक्ष, रामकृष्ण मिशन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *