२० जून दिनविशेष - 20 June in History
२० जून दिनविशेष - 20 June in History

हे पृष्ठ २० जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २० जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 20th June. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • जागतिक शरणार्थी दिन (World Refugee Day)
  • ध्वज दिन: आर्जेन्टिना.

महत्त्वाच्या घटना:

रँग्लर र. पु. परांजपे
रँग्लर र. पु. परांजपे

१८३७: व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी

१८४०: सॅम्युअल मोर्स यांना टेलिग्राफ चा पेटंट मिळाला.

१८६३: वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.

१८७७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरवात केली.

१८८७: देशातील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. टी.) सुरू झाले.

१८९९: केंब्रिज विद्यापीठाच्या ’ट्रायपॉस’ या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.

१९२१: टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना

१९६०: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना

१९९०: ७.४ मेगावॅटचा भूकंपात इराण मध्ये ५०,००० लोक ठार तर १,५०,००० पर्यंत जखमी झाले.

१९९७: ’महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’तर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.

२००१: परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.

२०१४: प्रसिद्ध कवी केदारनाथ सिंह यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित करण्यात आला.

लक्ष्मणराव किर्लोस्कर
लक्ष्मणराव किर्लोस्कर

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८५६: प्रसिद्ध ब्रिटीश व्यापारी व राजकारणी सर एडवर्ड अल्बर्ट ससून(Edward Albert Sassoon) यांचा जन्मदिन.

१८६९: लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक (मृत्यू: २६ सप्टेंबर १९५६)

१८७६: भारतीय तेलगु भाषिक चित्रपट क्षेत्राच्या इतिहासातील प्रसिद्ध पहिले गीतकार चांदला केसावदासू यांचा जन्मदिन.

रमाकांत देसाई
रमाकांत देसाई

१९१५: टेरेन्स यंग – चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९४)

१९२०: मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते (मृत्यू: २६ एप्रिल १९९९)

१९३९: रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष (मृत्यू: २८ एप्रिल १९९८)

स्टुअर्ट टेरेन्स हर्बर्ट यंग

१९४८: नौरूचे राष्ट्राध्यक्ष लुडविग स्कॉटी यांचा जन्म.

१९५२: भारतीय लेखक आणि कवी विक्रम सेठ यांचा जन्म.

१९५४: अ‍ॅलन लॅम्ब – इंग्लिश क्रिकेटपटू

१९७२: पारस म्हांब्रे – क्रिकेटपटू

१९७६: प्रसिद्ध भारतीय महिला कसोटी व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देविका पळशीकर यांचा जन्मदिन.

वासुदेव वामन तथा ’भाऊसाहेब’ पाटणकर ऊर्फ ’जिंदादिल
वासुदेव वामन तथा ’भाऊसाहेब’ पाटणकर ऊर्फ ’जिंदादिल

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६६८: हेन्‍रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (जन्म: १८ डिसेंबर १६२०)

१८३७: विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)

१९१७: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जेम्समेसन क्राफ्ट्स यांचे निधन.

१९३०: ब्रिटीश कालीन रामपूर रियासतचे नवाब हमीद अली खान बहादूर यांचे निधन.

१९७२: साली प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ प्रा. कोट्टरलाकोटा रंगधामा राव यांचे निधन.

चंद्रकांत गोखले
चंद्रकांत गोखले

१९८७: जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक पद्मभूषण डॉ. सलीम अली यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८९६)

१९९७: बासू भट्टाचार्य – चित्रफट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक (जन्म: ? ? १९३४)

१९९७: वासुदेव वामन तथा ’भाऊसाहेब’ पाटणकर ऊर्फ ’जिंदादिल’ – मराठीतले पहिले शायर (जन्म: ? ? १९०८)

२००७: सुप्रसिद्ध भारतीय बंगाली चित्रपट अभिनेत्री अनिता गुहा यांचे निधन.

२००८: चंद्रकांत गोखले – अभिनेते (जन्म: ७ जानेवारी १९२१)

२००९: पाकिस्तान देशाचे कीटकशास्त्रज्ञ, प्राध्यापक, अभिनेते आणि उद्योजक दतुक रहमान अन्वर सय्यद यांचे निधन.

२०१०: माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू गुंडीबाईल रामा सुंदराम यांचे निधन.

२०१३: भारतीय पत्रकार डिकी रुतनागुर यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १९३१)

१९८७: जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक डॉ. सलीम अली यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८९६)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *