७ जानेवारी दिनविशेष - 7 January in History
७ जानेवारी दिनविशेष - 7 January in History

हे पृष्ठ 7 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ७ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 7 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६१०: गॅलेलिओ यांनी दुर्दार्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.

१६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.

जॉर्ज वॉशिंग्टन
जॉर्ज वॉशिंग्टन

१७१४: पहिल्यांदा हेनरी मिल ने टाईप राईटर चा शोध लावला.

१७८९: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.

१९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.

१९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.

फिडेल कॅस्ट्रो
फिडेल कॅस्ट्रो

१९३५: कोलकाता येथे ’इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी’चे (INSA) उद्‌घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.

१९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.

१९६८: अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.

१९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.

१९७८: एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्‍यांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.

१९८०: पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणूकांमध्ये कॉंग्रेस बहुमताने विजयी.

२००३: जपान ने विकास कामांसाठी भारताला ९० कोटी डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली.

२०१४: आजच्या दिवशी शेख हसीना ने बांगलादेश च्या निवडणुक जिंकली.

शोभा डे
शोभा डे

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८९३: जानकीदेवी बजाज – स्वातंत्र्य वीरांगना (मृत्यू: २१ मे १९७९)

१९२०: सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी (मृत्यू: १९ एप्रिल २००८)

१९२१: चंद्रकांत गोखले – अभिनेते (मृत्यू: २० जून २००८)

१९२५: ’प्रभात’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या (मृत्यू: ? ? ????)

१९२८: विजय तेंडुलकर – नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक (मृत्यू: १९ मे २००८ – पुणे, महाराष्ट्र)

बिपाशा बासू
बिपाशा बासू
सुप्रिया पाठक
सुप्रिया पाठक

१९४८: शोभा डे – विदुषी व लेखिका

१९५०: ला बाल मजूर विरोधी कार्यकर्त्या शांता सिन्हा यांचा जन्म.

१९६१: सुप्रिया पाठक – अभिनेत्री

१९६७: ला जगप्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचा जन्म.

१९७९: बिपाशा बासू – अभिनेत्री व मॉडेल

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

डॉ. अच्युतराव आपटे
डॉ. अच्युतराव आपटे

१९८९: मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (जन्म: २९ एप्रिल १९०१)

१९४३: वाय फाय चा शोध लावणारे संशशोधक निकोला टेसला यांचे निधन.

२०००: डॉ. अच्युतराव आपटे – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्‍च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयुष्य वेचलेले विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ? ? ????)

२०१६: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *