हे पृष्ठ 21 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that have occurred on 21st May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
World Day For Cultural Diversity For Dialogue And Development
संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेसाठी जागतिक दिवस
जागतिक दहशतवाद विरोधी दिन (National Anti-Terrorism Day)
जागतिक ध्यान दिवस (World Meditation Day)
आरमार दिन – चिली.
स्वातंत्र्य दिन – मॉँटेनिग्रो.
महत्त्वाच्या घटना:
१८८१: वॉशिंग्टन (डी. सी.) येथे अमेरिकन रेड क्रॉस ची स्थापना झाली.
१८८१: युरोपीय देशांतील गृहयुद्ध संपल्यानंतर क्लारा बार्टन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. मध्ये अमेरिकन रेड क्रॉसची स्थापना केली.
१९०४: पॅरिसमध्ये फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) ची स्थापना झाली.
१९२७: चार्ल्स लिंडबर्ग यांनी एकट्याने जगातील पहिले न थांबता अटलांटिक महासागर पार करणारे उड्डाण पूर्ण केले.
१९३२: अमेलिया इअरहार्ट ह्या अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
१९७०: अमेरिका राष्ट्राने देशांत आण्विक शास्त्राची चाचणी केली.
१९९१: पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे आत्मघातकी पथकाने हत्या केली.
१९९२: चीनने १,००० किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.
१९९४: ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.
१९९६: सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१४७१: आल्ब्रेख्त ड्यूरर, जर्मन चित्रकार.
१५२७: फिलिप दुसरा, स्पेनचा राजा.
१७९२: गुस्ताव कोरियोलिस, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ
१९१४: जगातील सर्वात जास्त उंचीचे माउंट एव्हरेस्ट शिखर प्रथम चढून जाण्याचा मान मिळवणारे शेर्पा तेनसिंग यांचा नेपाळमधील थामी गावी जन्म..
१९१६: अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९७)
१९२१: आंद्रेई सखारोव्ह, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
१९२२: प्रसिद्ध अमेरिकन आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कोर्टाचे न्यायाधीश जेम्स लोपेझ वॉटसन यांचा जन्मदिन.
१९२३: स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट २००३)
१९२८: कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)
१९३०: माल्कम फ्रेझर, ऑस्ट्रेलियाचा २२वा पंतप्रधान.
१९३१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९१)
१९४४: मेरी रॉबिन्सन, आयर्लंडची राष्ट्राध्यक्ष.
१९५६: अभिनेता रविन्र्द मंकणी यांचा जन्म.
१९५८: भारतीय-अमेरिकन फॅशन डिझायनर नइम खान यांचा जन्म.
१९६०: दक्षिण भारतीय अभिनेता मोहनलाल यांचा जन्म.
१९७१: प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माता व पटकथा लेखक आदित्य चोपडा यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१४७१: इंग्लंडचा राजा हेन्री (सहावा) यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १४२१)
१६८६: वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १६०२)
१९२९: आर्चिबाल्ड प्रिमरोझ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१९७३: बाळकृष्ण ढवळे, मराठी मुद्रण व प्रकाशन क्षेत्रातील व्यवसायिक.
१९७९: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १८९३)
१९९१: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या. (जन्म: २० ऑगस्ट १९४४)
१९९३: ब्रिटीश सैन्य दलातील हवाई अधिकारी मेजर जनरल जॉन डटन “जॉनी” फ्रॉस्ट यांचे निधन.
१९९८: इंटकचे सोलापुरातील नेते आबासाहेब बाबूराव किल्लेदार यांचे निधन.
२०००: हर्बालाइफ कंपनी चे स्थापक मार्क आर. ह्यूजेस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९५६)
२००२: सुलतान अहमद, निर्माते दिग्दर्शक.
२००५: बंगाल वंशीय सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांचे निधन.