२० मे दिनविशेष - 20 May in History
२० मे दिनविशेष - 20 May in History

हे पृष्ठ 20 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 20th May. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक मधमाशी दिन

दरवर्षी 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिवस साजरा केला जातो. 20 मे 1734 रोजी आधुनिक मधमाशी पालन तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाणारे अँटोन जंसा यांचा जन्म स्लोव्हेनियामध्ये झाला.

महत्त्वाच्या घटना:

५२६: सिरीया आणि अँटोचियात झालेल्या एका भूकंपात सुमारे ३,००,००० लोकांचा मृत्यू.

पोर्तुगालचा वास्को-द-गामा
पोर्तुगालचा वास्को-द-गामा

१४९८: पोर्तुगालचा वास्को-द-गामा दोनशे खलाश्यांसह भारतातील कालिकत बंदरामध्ये येऊन पोहचला.

१५४०: छायाचित्रकार अब्राहम ऑरटेलियस यांनी थॅट्रम ऑरबिस टेरारम हा पहिला आधुनिक अॅटलास प्रकाशित केला.

१८७३: लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणे असलेल्या निळ्या जीन्स चे पेटंट घेतले.

१८९१: थॉमस एडीसन यांनी किनेटोस्कोप चे पहिला प्रोटोटाइप प्रदर्शित केले

१९०२: क्यूबा देश अमेरिकेपासून स्वातंत्र्य झाला.

१९४८: चिआंग काई शेक चीन गणराज्यचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.

१९९५: रशियाने मानव रहित अंतरीक्ष यान ‘स्पेक्त्र’ च प्रक्षेपण केलं.

१९९६: देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द’इयर हा पुरस्कार जाहीर.

२०००: राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती जी. एम. सी. बालयोगी यांची एकमताने निवड झाली.

२००१: चित्रपट निर्माते व लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर.

२०१४: लोकसभा निवडणुकांत बहुमत मिळवून भारतीय जनता पक्ष भारतात सत्तेवर. नरेन्द्र मोदीची पंतप्रधानपदी नेमणूक.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

विष्णुशास्त्री चिपळूणकर
विष्णुशास्त्री चिपळूणकर

१८१८: अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनी चे सहसंस्थापक विल्यम फार्गो यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १८८१)

१८२२:  फ्रेडेरिक पॅसी, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ.

१८५०: विष्णुशास्त्री चिपळूणकर, आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार.

१८५१: ग्रामोफोन रेकॉर्ड चे शोधक एमिल बर्लिनर यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९२९)

Frédéric Passy,
Frédéric Passy

१८६०:  एडुआर्ड बुखनेर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.

१८८२: सिग्रिड उंडसेट, नोबेल पारितोषिक विजेता नॉर्वेजियन लेखिका.

१८८४: प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९२२)

१९००: छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी सुमित्रानंदन पंत यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर १९७७)

१९०६: सुप्रसिद्ध भारतीय आधुनिक शिल्पकार व चित्रकार रामकिंकर बैज यांचा जन्मदिन.

१९१३: हेव्हलेट-पॅकार्ड चे सहसंस्थापक विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी २००१)

१९१५: इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख मोशे दायान यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९८१)

१९१८: भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मान  परमवीर चक्र सन्मानित भारतीय लष्कर दलातील सेवानिवृत्त अधिकारी मेजर पिरुसिंह यांचा जन्मदिन.

१९४४: रेड बुल चे सहसंस्थापक डीट्रिख मत्थेकित्झ यांचा जन्म.

१९५२: कॅमेरुनचा फूटबॉलपटू रॉजर मिला यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१५०६: इटालियन दर्यावर्दी व संशोधक ख्रिस्तोफर कोलंबस यांचे निधन.

१५७१: राघवचैतन्यांचे विख्यात शिष्य व संत तुकारामांचे गुरु, केशवचैतन्य ऊर्फ बाबाचैतन्य यांनी जुन्‍नरजवळील ओतूर येथे समाधी घेतली.

बिपिनचंद्र पाल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
बिपिनचंद्र पाल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक

१७६६: इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १६९३)

१८७८: समाजसुधारक व संस्कृत विद्वान कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे निधन.

१९२९: स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारक व महात्मा गांधी यांच्या चंपारण सत्याग्रहातील प्रमुख सदस्यांपैकी एक राजकुमार शुक्ल यांचे निधन.

१९३२: लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८५८)

१९५७: भारतीय स्वातंत्र्यसेना व राजकारणी तसचं, मद्रास प्रांताचे भूतपूर्व मुख्यमंत्री व आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री तंगुटुरी प्रकाशम पंतुळु यांचे निधन.

१९६१: कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते भाई विष्णूपंत चितळे यांचे निधन.

१९९२: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगांवकर यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९१६)

१९९४: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के. ब्रम्हानंद रेड्डी यांचे निधन. (जन्म: २८ जुलै १९०९)

१९९७: इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील विश्वकर्मा माणिकराव लोटलीकर यांचे निधन.

२०१२: भारतीय मानववंशशास्त्रज्ञ लीला दुबे यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १९२३)

२०१२: रिमोट कंट्रोल चे शोधक यूजीन पॉली यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९१५)

२०००: एस.पी. गोदरेज, भारतीय उद्योगपती

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *