२३ डिसेंबर दिनविशेष - 23 December in History
२३ डिसेंबर दिनविशेष - 23 December in History

हे पृष्ठ 23 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २३ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 23 December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

शेतकरी दिन

भारताचे पाचवे पंतप्रधान श्री चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 23 डिसेंबर रोजी शेतकरी दिन किंवा किसान दिवस साजरा केला जातो.

महत्त्वाच्या घटना:

१६७२: ला जियान डोमेनेको कॅसिनी यांनी आजच्या दिवशी शनीचा उपग्रह रिया शोधून काढला होता.

१८९३: ’हॅन्सेल अ‍ॅंड ग्रेटेल’ या प्रसिद्ध सांगितिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला.

१८९४: रवींद्रनाथ टागोर यांनी आजच्या दिवशी पूस जत्रेचे उद्घाटन केले होते.

वि. वा. शिरवाडकर
वि. वा. शिरवाडकर

१९१४: पहिले विश्वयुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो (इजिप्त) येथे आगमन.

१९२१: शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.

१९४०: वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे ‘हिन्दुस्थान एअरक्राफ्ट‘ हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.

१९४७: अमेरिकेतील ’बेल रिसर्च लॅब्ज’ या संशोधन संस्थेने ’ट्रॅन्झिस्टर’ या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामधे होणार्‍या मोठ्या क्रांतीची ही सुरुवात होती.

१९५४: बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९५४: डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.

१९६८: हवामान संबंधी माहिती मिळविण्यासाठी देशाचे पहिले मेनका रॉकेट चे यशस्वी प्रक्षेपण.

१९६९: चंद्रावरून आणल्या गेलेले काही दगडांचे नमुने दिल्लीला एका प्रदर्शनी मध्ये ठेवण्यात आले.

१९७०: धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.

२०००: कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी

बौद्ध स्तूप
बौद्ध स्तूप

२००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.

२००८: वर्ल्ड बँक ने सत्यम सॉफ्टवेअर कंपनी वर प्रतिबंध आणला होता.

२००८: भारताचे प्रसिद्ध कादंबरीकार गोविन्द मिश्रा यांना साहित्य साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केल्या गेले.

२०१३: सलमान खान विरुद्ध १७ साक्षीदारांनी साक्ष नोदवल्यानंतर सत्र न्यायालयाने सलमान खान विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत, खटला सत्र न्यायालयात वर्ग केला.

कविचंद्र कालिचरण पटनाईक
कविचंद्र कालिचरण पटनाईक

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६९०: मणिपूर साम्राज्याचे सम्राट पामेबा यांचा जन्म.

१८५४: हेन्‍री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ एप्रिल १९२६)

१८९७: कविचंद्र कालिचरण पटनाईक – ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार (मृत्यू: ? ? ????)

चौधरी चरण सिंग
चौधरी चरण सिंग

१९०२: चौधरी चरण सिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ’लोकदल’ पक्षाचे संस्थापक (मृत्यू: २९ मे १९८७)

१९१८: चित्रपट पात्र अभिनेते कुमार पल्लना यांचा जन्म.

१९४२: भारतीय चित्रपट कलाकार अरुण बाली यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ
थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्र

१८३४: थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (जन्म: १३ फेब्रुवारी १७६६)

१९२६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या (जन्म: २ फेब्रुवारी १८५६)

१९४७: ला भारतीय गणितज्ञ जियाउद्दीन अहमद यांचे निधन.

१९६५: गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक, ’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक (जन्म: २ जुलै १८८०)

रत्‍नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक
रत्‍नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक

१९७९: दत्ता कोरगावकर – हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार (याद, बडी माँ, दामन, नादान, रिश्ता, चंद्रराव मोरे, सुखाचा शोध, गीता, गोरखनाथ, गोरा कुंभार, सूनबाई, महात्मा विदूर, हरिहर भक्ती, रायगडचा बंदी) (जन्म: ? ? ????)

१९९८: रत्‍नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते, इचलकरंजीच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८५), खासदार (१९५२), आमदार (शिरोळ), महाराष्ट्र सरकारचे गहराज्य मंत्री, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य (जन्म: १५ सप्टेंबर १९०९ – निमशिरगाव, शिरोळ, कोल्हापूर)

नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई
नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई

२०००:मलिका-ए-तरन्नुम’ म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन (जन्म: २१ सप्टेंबर १९२६ – कसुर, पंजाब, भारत)

२००४: नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री (जन्म: २८ जून १९२१)

२००८: गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक (जन्म: ३१ जानेवारी १९३१)

२०१०: के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक (जन्म: ५जुलै १९१६)

२०१०: ज्ञानेश्वर नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक. त्यांचे ’पाऊस’, ’भरती’, ’चिद्‌घोष’,हे कथासंग्रह, ’दोन बहिणी’, ’ ’कोंडी’ या कादंबर्‍या व ’पिकासो’ हे चरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: २१ मे १९२८)

२०१३: एके ४७ रायफलचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९१९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *