हे पृष्ठ 13 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 13 February. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- सरोजनी नायडू यांची जयंती.
- व्हॅलेंटाईन आठवड्याचा सातवा दिवस (कीस डे)
महत्त्वाच्या घटना:
१६३०: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर येथे पोहोचला.
१६६८: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१७३९: कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.
१९३१: आजच्या दिवशी दिल्ली ला भारताची राजधानी घोषित करण्यात आली.
१९४८: आजच्या दिवशी गांधीजीनी आमरण उपोषणास सुरुवात केली.
१९८४: युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.
१९८८: कॅनडात कॅल्गारी येथे १५वे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
२००१: पहिले मानव रहित अंतरिक्षयान एरोस नावाच्या लघुग्रहावर उतरले.
२००३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
२०१०: पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७६६: थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४)
१८३५: मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक (मृत्यू: २६ मे १९०८)
१८७९: सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (मृत्यू: २ मार्च १९४९)
१८९४: वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार (मृत्यू: १६ जुलै १९८६)
१९१०: दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित (मृत्यू: १ मार्च १९९९)
१९११: फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८४)
१९१६: भारतीय सेनेतील सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल जगजीत सिंह अरोड़ा यांचा जन्म.
१९४५: विनोद मेहरा – अभिनेता (मृत्यू: ३० आक्टोबर १९९०)
१९७६: भारतीय चित्रपट अभिनेता शरद कपूर यांचा जन्म.
१९७८: भारतीय चित्रपट अभिनेता अश्मित पटेल यांचा जन्म.
१९८७: तमिळनाडू चे माजी मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचे निधन.
१९९५: धावपटू वरुणसिंग भाटी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८८३: रिचर्ड वॅग्नर – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक (जन्म: २२ मे १८१३)
१९०१: लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (जन्म: ९ मार्च १८६३)
१९६८: गोपाळकृष्ण भोबे – संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक (जन्म: ? ? ????)
१९७४: ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक (जन्म: १५ ऑगस्ट १९१२)
२००८: राजेन्द्र नाथ – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते (जन्म: ? ? १९३१)
२०१२: अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी (जन्म: १६ जून १९३६)
sant gadge maharaj jayanti 23 feb la ahe apan chukichi sangat ahat
Thank you for the information. We have fixed this.