१६जून दिनविशेष - 16 June in History
१६जून दिनविशेष - 16 June in History

हे पृष्ठ 16 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही 16 जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 16th June. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा
व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा

१८५८: अठराशे सत्तावनच्या संग्रामातील मोरारची लढाई

१९०३: फोर्ड मोटर कंपनीची स्थापना.

१९११: एन्डिकोट, न्यूयॉर्क येथे द कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग कंपनीची स्थापना झाली. याच कंपनीचे पुढे आय. बी. एम. या बलाढ्य कंपनीत रुपांतर झाले.

१९१४: सहा वर्षाच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका

१९४७: नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा ‘बाबुराव‘ पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.

१९६३: व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेने वोस्तोक – ६ या यानातून अंतराळप्रवास करुन जगातील पहिला अंतराळ वीरांगना होण्याचा मान मिळवला.

१९९०: मुंबई व उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. गेल्या १०४ वर्षातील जूनमधे एका दिवसात पडलेल्या पावसाचा (६००.४२ मि.मि.) उच्‍चांक गाठला गेला.

२०१०: तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला.

अ‍ॅडॅम स्मिथ
अ‍ॅडॅम स्मिथ

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७२३: अ‍ॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (मृत्यू: १७ जुलै १७९०)

१९२०:  हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.

१९३६: अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी (मृत्यू: १३ फेब्रुवारी २०१२)

हेमंत कुमार मुखोपाध्याय
हेमंत कुमार मुखोपाध्याय
अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल

१९५०: भारतीय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म.

१९६८: अरविंद केजरीवाल – ’आम आदमी पार्टी’चे संस्थापक, समाजसेवक व सनदी अधिकारी

१९९४: आर्या आंबेकर, प्रसिद्ध गायिका.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

देशबंधू चित्तरंजन दास
देशबंधू चित्तरंजन दास

१८६९: भारतीय-इंग्रजी वनस्पतीशास्त्रज्ञ व संशोधक चार्ल्स स्टर्ट यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १७९५)

१९२५: बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी देशबंधू चित्तरंजन दास यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १८७०)

१९३०: गॅरोकोम्पास चे सहसंशोधक एल्मर अॅम्ब्रोज स्पीरी यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८६०)

आचार्य प्रफुल्लचंद्र रे
आचार्य प्रफुल्लचंद्र रे

१९४४: आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, त्यांनी ’बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ ही कंपनी काढली. १८९६ मधे त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोग करुन मर्क्युरस नायट्रेटची निर्मिती केली. त्यांना ’मास्टर ऑफ नायट्रेटस’ म्हणत असत. (जन्म: २ ऑगस्ट १८६१)

१९७१: बीबीसी चे सह-संस्थापक जॉन रीथ यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८८९)

१९७७: श्रीपाद गोविंद नेवरेकर, मराठी रंगभुमीवरील लोकप्रिय गायक, नट.

१९९५: शुद्धमती तथा ’माई’ मंगेशकर – मंगेशकरांच्या मातोश्री

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *