Title | Symbol | Image | Notes |
---|---|---|---|
राष्ट्रीय झेंडा | भारत ध्वज | भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी, अंगीकारला गेला.भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. यामुळे या झेंड्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते. मधल्या पांढर्या रंगात निळ्या रंगाचे २४ आर्यांचे अशोक चक्र आहे. मच्छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.
भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. | |
राष्ट्रीय चिन्ह | भारताचे राष्ट्रीय प्रतीक | – | भारताचे राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे. हे प्रतीक भारताच्या २६ जानेवारी १९५० रोजी पहिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी स्वीकारले गेले.
भारताच्या राष्ट्रीय चिन्हा मध्ये मूळ स्तंभामधील काही भाग दिसतो. यामध्ये ४ पैकी ३ सिंह दिसतात. या ३ पैकी १ सिंह समोर बघतो आहे तर बाकी २ सिंह उजव्या व डाव्या बाजूला बघत आहेत. त्याखाली मध्यभागी अशोकचक्र आहे. अशोकचक्राच्या डाव्या बाजूस घोडा व उजव्या बाजूस बैल आहे. या खाली देवनागरी लिपीत सत्यमेव जयते लिहिले आहे. |
राष्ट्रीय कॅलेंडर | शक दिनदर्शिका | – | |
राष्ट्रगीत | जण गण मन | – | जन गण मन भारताचे राष्ट्रगीत आहे. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचे हिंदीतील भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणुन स्वीकार केलेला आहे. घटना समितीने २४ जानेवारी १९५0 मध्ये देशाचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून ‘जन गन मन’चा स्वीकार केला. |
राष्ट्रीय गीत | वंदे मातरम | – | वन्दे मातरम् या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार राष्ट्रीय गीत हा दर्जा मिळालेला आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी इ.स. १८८२ मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये हे गीत लिहिले होते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणागीत बनले. |
निष्ठा कपातीची शपथ | राष्ट्रीय तारण | – | – |
राष्ट्रीय फूल | कमळ | कमळ हे एक जलपुष्प असून याला पद्म,नलिन, सारस, पुष्कर, तामरस, अरविंद, शतपत्र, राजीव इ.अनेक नावे आहेत. प्राचीन काळापासून भारतीयांचे सर्वांत आवडते पुष्प म्हणून कमळाचा उल्लेख करता येईल व म्हणूनच राष्ट्रीय फूल म्हणून कमळालाच मान्यता मिळाली | |
राष्ट्रीय फळ | आंबा | भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत शत्रू असले तरी एक अशी वस्तू आहे जी दोघांमध्ये समान आहे. आंबा हे भारत व पाकिस्तान यांचे राष्ट्रीय फळ आहे. आंब्याचं झाड हे बांगलादेशाचे राष्ट्रीय झाड आहे आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्हही आहे. | |
राष्ट्रीय नदी | गंगा | गंगा नदी ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्वाची नदी आहे. तसेच ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. या नदीची लांबी २,५२५ किमी आहे. गंगा नदीचा उगम भारतातील उत्तराखंड या राज्यात हिमालय पर्वतात होतो. | |
राष्ट्रीय वृक्ष | वडाचे झाड | वड (मराठी नामभेद: वटवृक्ष ; शास्त्रीय नाव: Ficus benghalensis, फायकस बेंगालेन्सिस ; इंग्लिश: banyan, बन्यान 😉 हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. | |
राष्ट्रीय प्राणी | रॉयल बंगाल वाघ | बंगाल वाघ (पन्थेरा टाइग्रिस टाइग्रिस), सर्वात मोठा मांसभक्षक प्राणी केवळ भारतीय उपखंडात आढळतो आणि तो देशाच्या बर्याच भागात आढळतो. | |
राष्ट्रीय जलजीव प्राणी | डॉल्फिन | गंगा नदीच्या पृष्ठभागावर आढळणारे डॉल्फिन (प्लॅटिनस्टास्ट गॉमेंटीिका) पवित्र गंगा नदीची पवित्रता दर्शवित आहे कारण ती केवळ शुद्ध आणि ताजे पाण्यामध्ये टिकून राहू शकते. | |
राष्ट्रीय पक्षी | भारतीय मोर | सन १९६३ मध्ये मोर ला राष्ट्रीय पक्षी चा दर्जा प्राप्त झाला. | |
राष्ट्रीय चलन | भारतीय रुपया | भारतीय रुपया (अनेकवचन: रुपये) हे भारतीय गणराज्याचे अधिकृत चलन आहे. एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो. रुपे हा चांदी-रजत, या धातूपासून बनलेला एक मिश्र धातू आहे. रुप्यापासून बनविलेला तो रुपया-पूर्वीचे राजे चलनासाठी चांदीचे नाणे बनवीत असत. | |
नॅशनल मायक्रोबे | लैक्टोबॅसिलस डेलब्र्यूकेय सबप बुलगारीकस | – | |
राष्ट्रीय खेळ | हॉकी | भारतीय प्रजासत्ताक कुठल्याही खेळला राष्ट्रीय क्रीडा म्हणून चिन्हित करत नाही परंतु हॉकी देशाच्या अनधिकृत राष्ट्रीय खेळ मानल्या जातो. | |
राष्ट्रीय भाजी | वांगे | – | |
भारताचे राष्ट्रीय सरपटणारे प्राणी | किंग कोबरा | 18.5 to 18.8 ft (5.6 to 5.7 m), असेलेल्या किंग कोबरा हा भारताचे राष्ट्रीय सरपटणारे प्राणी म्हणून ओळखले जातात. | |
भारतातील राष्ट्रीय वारसा प्राणी | हत्ती | भारतातील राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून हत्ती ओळखला जातो. |