१७ जून दिनविशेष - 17 June in History
१७ जून दिनविशेष - 17 June in History

हे पृष्ठ 17 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही 7 जून  रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 17th June. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • स्वातंत्र्य दिन (आईसलँड)
  • दुष्काळ आणि वाळवंटीकरण नियंत्रण दिवस
  • फादर्स डे – एल साल्वाडोर आणि ग्वाटेमाला

महत्त्वाच्या घटना:

भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल
भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल

१६३२: मुघल बादशाह शहाजहान याची पत्नी मुमताज हिचे निधन. तिच्या स्मरणार्थ शहाजहान याने आग्रा येथे ताजमहलची निर्मिती केली.

१७९९: फ्रांस सम्राट नेपोलियन बोनापार्ट(Napoleon Bonaparte) यांनी इटली देश आपल्या साम्राज्यात सामावून घेतला.

१८८५: न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.

१९१७:  महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी हे साबरमती आश्रमातील हृदय कुंज या टिकाणी रहायला गेले. 

१९२९: सोवियत संघाने चीन बरोबर असणारे आपले राजनैतिक संबंध संपुष्टात आणले.

१९३३: सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात आली

१९४०: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.

१९४४: आइसलँडने (डेन्मार्कपासुन) स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.

१९४४: जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात हार मानली

राजीव गांधी
राजीव गांधी

१९६३: अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.

१९६७: चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.

१९७०: शिकागोत पहिल्यांदाच किडनी ट्रान्सप्लॅन्टची शस्त्रक्रिया करण्यात आली

१९७२: वॉटरगेट कुभांड – डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यालय फोडून कागदपत्रे पळवल्याबद्दल रिचर्ड निक्सनच्या चार साथीदारांना अटक.

१९९१: भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर

२००४: मंगळावर पृथ्वीप्रमाणेच दगड सापडले.

२००८: ‘तेजस’ विमानाची पहिल्यांदाच यशस्वी चाचणी करण्यात आली.

२०१२: भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी इंडोनेशिया ओपन स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली.

२०१३: भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात १३ इंच पाऊस पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

लिअँडर पेस
लिअँडर पेस

१२३९: एडवर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ७ जुलै १३०७)

१७०४: फ्लाइंग शटल चे शोधक जॉन के यांचा जन्म.

१८६७: लघुलेखन पद्धतीचा शोधक जॉनरॉबर्ट ग्रेग यांचा जन्म.

१८८७: प्रख्यात भारतीय राजकारणी, मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय संरक्षणमंत्री तसचं, पश्चिम बंगाल व ओरिसा राज्याचे माजी राज्यपाल कैलाशनाथ काटजू यांचा जन्मदिन.

१८९८: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल हेर्मान यांचा जन्म.

१९०३: बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक? (मृत्यू: ७ डिसेंबर १९८२)

१९०३: चॉकोलेट चिप कुकी चे निर्माते रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९७७)

शेन वॉटसन
शेन वॉटसन

१९२०: नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ फ्रांस्वा जेकब यांचा जन्म.

१९७३: लिअँडर पेस – भारतीय टेनिसपटू

१९८०: महान अमेरिकन व्यावसायिक टेनिसपटू वीनस विलियम्स(Venus Williams) यांचा जन्मदिन.

१९८१: शेन वॉटसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

राजमाता जिजाबाई
राजमाता जिजाबाई

१२९७: ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. (जन्म: २९ जानेवारी १२७४)

१६३१: शाहजहानची पत्नी मुमताज महल यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १५९३)

१६७४: राजमाता जिजाबाई (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री) (जन्म: १२ जानेवारी १५९८)

१८५८: झाशीच्या राणी लक्ष्मीबाई इंग्रजांच्या विरूद्ध चकमकीत धारातीर्थी.

१८३९: ब्रिटीश कालीन भारताचे १४ वे गव्हर्नर जनरल(राज्यपाल) लॉर्ड विलियम बेटिंक(Lord William Bentinck) यांचे निधन.

१८६५: ब्रिटीश कालीन भारतातील ब्रिटीश गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग (Lord Canning)यांचे निधन.

राणी लक्ष्मी बाई
राणी लक्ष्मी बाई

१८९३: भारताचे १४ वे राज्यपाल जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १७७४)

१८९५: गोपाळ गणेश आगरकरलोकमान्य टिळकांचे सहकारी व ’केसरी’चे पहिले संपादक, डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक व फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ, ’सुधारक’ या वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक (जन्म: १४ जुलै १८५६)

१९२८: पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक (जन्म: ९ आक्टोबर १८७७)

१९६५: मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘ – आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते (जन्म: ४ डिसेंबर १९१०)

गोपाळ गणेश आगरकर
गोपाळ गणेश आगरकर

१९८३: शरद पिळगावकर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व वितरक (जन्म: ? ? ????)

१९९६: मधुकर दत्तात्रय तथा ’बाळासाहेब’ देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक (जन्म: ११ डिसेंबर १९१५)

२००४: इंदुमती पारीख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *