हे पृष्ठ 29 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही २९ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 29 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१७८०: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी ’कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर’ या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले. ’हिकी’ज बेंगॉल गॅझेट’ या नावाने ओळखले जाणारे हे वृत्तपत्र म्हणजे भारतातील पत्रकारितेची सुरुवात मानली जाते.
१८६१: कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.
१८८६: कार्ल बेंझ याला जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.
१९७५: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ’ती फुलराणी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.
१९८९: हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१२७४: संत निवृत्तीनाथ (मृत्यू: १७ जून १२९७)
१७३७: थॉमस पेन – अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक (मृत्यू: ८ जून १८०९)
१८४३: विल्यम मॅक किनले – अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ सप्टेंबर १९०१)
१८५३: मधुसूदन राव – आधुनिक ओडिया साहित्याच्या तीन प्रवर्तकांतील एक प्रवर्तक. ओरिसावर मराठ्यांचे राज्य असताना महाराष्ट्रातून जी कुटुंबे ओरिसात जाऊन स्थायिक झाली, त्यांपैकी एका कुटुंबात जन्म. (मृत्यू: ? ? १९१२)
१८६०: अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी
घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही. (मृत्यू: १५ जुलै १९०४)
१८६६: रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (मृत्यू: ३० डिसेंबर १९४४)
१९२२: प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक (मृत्यू: १४ जुलै २००३)
१९२६: डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९९६ – ऑक्सफर्ड, इंग्लंड)
१९५१: अँडी रॉबर्टस – वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज
१९७०: राज्यवर्धनसिंग राठोड – ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१५९७: महाराणा प्रताप – मेवाडचा सम्राट (जन्म: ९ मे १५४०)
१८२०: जॉर्ज (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: ४ जून १७३८)
१९३४: फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (जन्म: ९ डिसेंबर १८६८ – वॉर्क्लॉ, पोलंड)
१९६३: रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी (जन्म: २६ मार्च १८७४)
१९६३: सदाशिव आत्माराम जोगळेकर – लेखक व संपादक. अहिल्या आणि इतर कथा, घारापुरी (१९४८), संयुक्त महाराष्ट्राचा ज्ञानकोश, सुलभ विश्वकोश ही त्यांची काही पुस्तके आहेत. (जन्म: ? ? ????)
१९९३: रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय – गणितज्ञ (जन्म: ? ? ????)
१९९५: रुपेश कुमार – रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)
२०००: पांडुरंग सावळाराम तथा काका वडके – शिवसेना नेते (जन्म: ? ? ????)
२०००: देवेन्द्र मुर्डेश्वर – बासरीवादक (जन्म: ? ? ????)
२००१: राम मेघे – महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री (जन्म: ? ? ????)