९ मे दिनविशेष - 9 May in History
९ मे दिनविशेष - 9 May in History

हे पृष्ठ 9 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 9th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • विश्व थॅलस्सेमिया दिन
  • विजय दिन : रशिया व भूतपूर्व सोवियेत संघातील राष्ट्रे.
  • युरोप दिन : युरोपीय संघ.
  • मुक्ति दिन : जर्सी, गर्न्सी व ईतर चॅनेल द्वीपे.

महत्त्वाच्या घटना:

१५७६: साली मेवाड शासक महाराणा प्रताप आणि मुघल शासक बादशाहा अकबर यांच्यात हल्दीघटीचे युद्ध झाले.

१६५३: साली विश्वविख्यात जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नोंदल्या गेलेली ऐतिहासिक वास्तू ताजमहल ची निर्मिती जवळपास २२ वर्षानंतर पूर्ण झाली

१८७४: मुंबईत प्रथम घोड्यांची ट्राम सुरु झाली.

१८७७: पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.

१९०४: वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी / ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.

१९३६: इटलीने इथिओपिया देश बळकावला.

१९५५: पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे प्रवेश.

१९७५: विजेवर चालणारी टंकलेखन मशीन तयार करण्यात आली

१९९९: अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.

१९९९: ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझ याने ग्रॅन्ड प्रिक्स स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत १ तास १७ मिनिटे व ४६ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

२००३: अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी गुगलने इंटरनेट प्रोग्राम एड्सेंस सादर केला.

२००९: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने चंद्रावर पाण्याचा शोध लावण्यासाठी आपला टोही नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला.

२०१२: अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी समलैंगिक विवाह करण्यास आपली अनुमती दिली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१५४०: मेवाडचा प्रसिध्द वीरपुरुष महाराणा प्रताप.

१८१४: दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार

१८३६: फ्रेंच नेत्र रोग विशेषज्ञ फर्डिनेंड मोनॉयर यांचा जन्मदिन.

१८६६: गोपाळ कृष्ण गोखले, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक.

१८८६: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९ – पुणे)

१८९६: थोर स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेता व शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक केशवराव मारुतराव जेथे यांचा जन्मदिन.

१९२८: वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.

१९३५: सुप्रसिद्ध भारतीय हिंदी कवयित्री स्नेहमयी चौधरी यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१३३८: भगवद्‍भक्त चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणार्‍या कुसबाखाली सापडला.

१९१७: डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणझोडदास यांचे निधन.

१९१९: रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १८६१)

१९३१: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८५२)

१९५९: थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १८८७)

१९५९: साली दक्षिण आफ्रिकेतील हिंदी विषयाचे प्राध्यापक व महात्मा गांधी यांचे निकटवर्तीय तसचं, राष्ट्रवादी, हिंदी आणि आर्य सामाजीक भारतीय स्वामी भवानी द्याल संन्यासी यांचे निधन.

१९८६: एवरेस्ट शिखर सर करणारा शेरपा तेलसिंग नोर्गे यांचे निधन. (जन्म: २९ मे १९१४)

१९९५: दिग्दर्शक अनंत माने यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १९१५)

१९९८: पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९२४ – लखनौ, उत्तर प्रदेश)

१९९९: उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या यांचे निधन.

२००४: चेचेन्या येथे झालेल्या विस्फोटात तेथील राष्ट्रपती अखमद कादरोव यांचे निधन.

२००८: किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. फिरोझ दस्तूर यांचे निधन.

२०१४: भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९३५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *