१० मे दिनविशेष - 10 May in History
१० मे दिनविशेष - 10 May in History

हे पृष्ठ 10 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 10th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • संविधान दिन : मायक्रोनेशिया.
  • पालक दिन : दक्षिण कोरिया.
  • मातृ दिन : मेक्सिको.
  • जलसंधारण दिन : महाराष्ट्र.

महत्त्वाच्या घटना:

१८१८: इंग्रज – मराठे तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

१८२४: लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली.

१८५७: मिरज येथे पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची पहिली ठिणगी पेटली.

१९०७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव लंडनमधे साजरा केला.

१९०९: सावरकरांनी ब्रिटिशांच्या आनंदोत्सवाला प्रत्युत्तर म्हणून लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये १८५७ च्या वीरांचा गौरव करणारा समारंभ आयोजित केला. त्यात त्यांनी आपल्या भाषणात त्या संघर्षाला उघड उघड स्वातंत्र्यसमर म्हटले.

१९३७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.

१९४०: दुसरे महायुद्ध – हिटलरने हॉलंड, बेल्जिअम आणि फ्रान्सवर आक्रमण केले.

१९४०: दुसरे महायुद्ध – नेव्हिल चेम्बरलेनने राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.

१९६२: मार्वल कॉमिक्सने द इक्रीडिबल हल्क या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित केला.

१९७९: मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले.

१९८१: फ्रान्सवा मितराँ फ्रान्सचे अध्यक्ष बनले.

१९८१: मुंबईमध्ये प्रथमच रात्रीच्या वेळी पकाशझोतात क्रिकेट सामना खेळण्यात आला.

१९९३: संतोष यादव हि दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.

१९९४: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली.

१९९७: ७.३ मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण मधील सुमारे १५६७ लोक ठार, २३०० लोक जखमी आणि ५०००० लोक बेघर झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१२६५: जपानचा सम्राट फुशिमी यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १३१७)

१८५५: भारतीय गुरु आणि शिक्षक युकतेश्वर गिरी यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९३६)

१८८९: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार नारायण दामोदर सावरकर यांचा जन्म.

१९०५: गायक व संगीतकार पंकज मलिक यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९७८)

१९०९: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर चे पहिले संचालक बेल्लारी शामण्णा केशवन यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०००)

१९१४: चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १९९२)

१९१८: रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी २००२)

१९२७: नयनतारा सहगल भारतीय लेखिका.

१९३१: ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर यांचा जन्म.

१९३७: माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस, मराठी कवी

१९४०: प्रसिद्धी पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च २०१२)

१९८६: बुद्धीबळपटू पेंड्याला हरिकृष्ण यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७७४: फ्रान्सचा राजा लुई (पंधरावा) यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १७१०)

१८९९: रँड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल महादेव विनायक रानडे यांना फाशी.

१९८१: विनोदी लेखक प्राध्यापक विमादि तथा विनायक माधव दीक्षित पटवर्धन यांचे निधन.

१९९८: पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२)

२०००: कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९०९)

२००१: महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल सुधाकरराव नाईक यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९३४)

२००२: गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १९१९)

२०१५: भारतीय इतिहासकार, लेखक निनाद बेडेकर यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १९४९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *