हे पृष्ठ 11 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that have occurred on 11th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन : भारत.
- मातृत्व दिन.
महत्त्वाच्या घटना:
१५०२: ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.
१८११: चँग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा एका चिनी दांपत्याच्या पोटी जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १८७४)
१८५७: पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम – स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्ली शहर जिंकले.
१८५८: मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.
१८६७: लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.
१८७८: महाराष्ट्रातील पुणे शहराच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले होते. यालाच अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणून संबोधले जाते.
१८८८: ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली.
१९२०: स्त्रियांना पदवीपरीक्षेसाठी प्रवेश देण्याचा ऑक्सफर्ड विद्यापिठाचा निर्णय.
१९२७: चलत चित्र कला व विज्ञान अकादमीची स्थापना. ही संस्था दरवर्षी ऑस्कार पुरस्कार बहाल करते.
१९४९: इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.
१९४९: सियाम या देशाने अधिकृतरीत्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलुन थायलंड केले.
१९५१: गझनीच्या महंमदने उध्दवस्त केलेया बारा ज्योतिर्लिंगापैकी एक सोमनाथ या मंदिरात शिवलिंग प्रतिष्ठापना डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते झाली.
१९८७: गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
१९९६: माउंट एव्हरेस्ट आपत्ती: एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शिखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.
१९९८: २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
१९९८: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
१९९९: टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८९५: जे. कृष्णमुर्ती, भारतीय तत्त्वज्ञानी.
१९०४: स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९८९)
१९१२: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि पटकथालेखक सादत हसन मंटो यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९५५)
१९१४: संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २००१)
१९१८: क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९८८)
१९४६: कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म.
१९५०: सुप्रसिद्ध भारतीय हिन्दी-मराठी चित्रपट अभेनिते सदाशिव दत्ताराय अमरापूरकर यांचा जन्मदिन.
१९६०: अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म.
१९७२: जेकब मार्टिन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८७१: ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक सर जॉन विल्यम हर्षेल यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७९२)
१८८९: जॉन कॅडबरी, इंग्लिश उद्योगपती.
१८८५: लोकनेते कृष्णमोहन बंदोपाध्याय.
१९९३: शाहू मोडक, अभिनेते.
२००४: चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचे निधन. (जन्म: २७ मे १९१३)
२००९: भारतीय नौसेनाधिपती सरदारिलाल माथादास नंदा यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९१५)